प्रसिद्ध आंगणेवाडी भराडी देवीचा यात्रोत्सव उद्या होणार असून यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी गर्दी नियंत्रण पथक, घातपात विरोधी यंत्रणा, वाहतूक नियंत्रण या दृष्टिकोनातून पोलीस प्रशासन सज्ज आहे. येथे २ अतिरिक्त पोलिस अधीक्षक, २ पोलीस उपअधीक्षक, ४०० पोलीस अंमलदार आणि १५० होमगार्ड तैनात करण्यात आलेत. तसेच आंगणेवाडी यात्रा आणि जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूक निकाल एकाच दिवशी असल्याने बाहेरून पोलीस फाटा मागविण्यात आला आहे. या यात्रेवर सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेराद्वारे लक्ष असणार आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांनी दिली.