भाजपचे युवानेते विशाल परब, जिल्हा बँक चेअरमन मनिष दळवी आणि भाजपचे जिल्हा संघटक महेश सारंग यांनी उबाठा सेनेला मोठा धक्का दिला आहे. माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातील कलंबिस्त सरपंच सपना सावंत, उपसरपंच, सदस्य आणि पदाधिकाऱ्यांनी उबाठा सेनेतून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा उबाठाला मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे माडखोल जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकीय समीकरणे आता बदलणार आहेत. या मतदारसंघात राहिलेली एकमेव ग्रामपंचायत भाजपने उबाठाकडून आपल्या हाती घेतली आहे.. तर भाजपने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात स्वबळाचा नारा दिला आहे.