हजारो कार्यकर्ते आले तेव्हाच हा पक्ष मोठा झाला आहे.सर्वसामान्य माणसाला ठगवून पैसे घेणाऱ्या कार्यकर्त्यावर युवा सेना पक्ष कारवाई करतच होती आणि करत राहणार, असं युवा स्वाभिमानी पार्टीचे रवी राणा यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यासोबतच त्यांनी जितू दुधाणे यांनी केलेल्या पक्षप्रवेशबाबतही टीका केली आहे. दुधाणेंनी युवा स्वाभिमानी पार्टी पक्षातून पळ काढला, त्यामुळे दिल्या घरी सुखी रहा अशा शुभेच्छा त्यांना दिल्या आहेत, असं वक्तव्य रवी राणा यांनी केलं आहे. पुढे राणा असंही म्हणाले की, प्रहारचे अनेक कार्यकर्ते आमच्या पक्षात काम करतात, आमच्या पक्षात प्रवेश करतात.पक्ष जेव्हा मोठा होतो तेव्हा पक्षात येणं-जाणं सुरुच असते. घरामध्ये राहून घरातील लोकांचा खिसा कापला त्यामुळे त्याला घराच्या बाहेर जावे लागले. अशी स्पष्ट भूमिका युवा स्वाभिमानी पार्टीचे रवी राणा यांनी मांडली आहे.