Weather | उद्यापासून राज्यातील तापमानाचा पारा कमी असेल – हवामान विभाग
राज्यात मागील काही दिवसांपासून उष्णतेची लाट आहे. राज्यातील सर्वच भागात ४० अंश सेल्सिअसच्यावरती तापमान आहे, त्यामुळे अंगाची लाही लाही होत आहे. एक ते दोन एप्रिलपर्यंत राज्यात उष्णतेची लाट असेल असा इशारा हवामान खात्याने दिला होता. पण आता एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. उद्यापासून राज्यातील तापमानाचा पारा कमी असेल तसेच पाच एप्रिलला कोकण व मध्य महाराष्ट्रात हलक्या व तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल असं हवामान तज्ञ सुषमा नायर यांनी माहिती दिली आहे, त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमृता यांनी