Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे अन् कोपरे येथील पाणीप्रश्न सुटणार! नगरसेवक सुभाष नाणेकर यांचं आयुक्तांना निवेदन

पुण्यातील शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे आणि कोपरे या भागातील नागरिकांना भेडसावत असलेला पाणी प्रश्न लवकरच सुटणार असल्याची माहिती समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 12, 2026 | 04:19 PM
शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे अन् कोपरे येथील पाणीप्रश्न सुटणार! नगरसेवक सुभाष नाणेकर यांचं आयुक्तांना निवेदन

शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे अन् कोपरे येथील पाणीप्रश्न सुटणार! नगरसेवक सुभाष नाणेकर यांचं आयुक्तांना निवेदन

Follow Us
Follow Us:
  • शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे अन् कोपरे येथील पाणीप्रश्न सुटणार!
  • नगरसेवक सुभाष नाणेकर यांचं आयुक्तांना निवेदन
  • तांत्रिक सल्लागारामार्फत प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार
पुणे : पुण्यातील शिवणे, उत्तमनगर, कोंढवे धावडे आणि कोपरे या भागातील नागरिकांना भेडसावत असलेला पाणी प्रश्न लवकरच सुटणार असल्याची माहिती समोर आली आहे. अनेक दिवसांपासून या परिसरात पाण्याची कमतरता जाणवत असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता. गेल्या काही दिवसाखाली नवराष्ट्रशी बोलतांना नवनिर्वाचित नगरसेवक सुभाष नाणेकर यांनी पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचं जनतेला आश्वासन दिलं होतं. आता नगरसेवक सुभाष नाणेकर यांनी प्रशासनाकडे निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली केली आहे.

 

नाणेकर यांच्या निवेदनाची दखल घेत आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली पुणे मनपाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप आणि कनिष्ठ अभियंता रोहन कापसे उपस्थित होते. बैठकीत पाणी समस्येवर चर्चा करण्यात आली आणि लवकरच तांत्रिक सल्लागारामार्फत प्रत्यक्ष पाहणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. पाहणीनंतर आवश्यक कामे करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

पाण्याचा प्रश्न सुटल्यास परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे हा प्रश्न मार्गी लागत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. महाराष्ट्र शासन व पुणे महानगरपालिका यांच्या विशेष निधीतून लवकरच या भागातील पाणी समस्या कायमची दूर होईल, अशी माहिती नगरसेवक सुभाष नाणेकर यांनी दिली आहे.

हे सुद्धा वाचा : राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी नगरसेवक म्हणून मिळणारे मानधन नाकारले; गरजू रुग्णांसाठी महापौर निधीला वर्ग

गेल्या काही दिवसाखाली नाणेकर यांनी नवराष्ट्रला मुलाखत दिली होती. नागरिकांच्या अनेक समस्या सोडविण्याचे त्यांनी आश्वासन दिले होते. पाण्याचा प्रश्न मिटवणार असल्याचीही त्यांनी ग्वाही दिली होती. तसेच मी सरपंच असताना उत्तमनगर भागात अनेक नागरिकांच्या सोडविल्या, असंही त्यांनी सांगितलं होतं. नाणेकर हे भाजपमधील निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. पुण्यातील प्रभाग क्रमांक ३३ (क) मधून भाजपचे सुभाष मुरलीधर नाणेकर विजयी झाले आहेत. विजयी झाल्यानंतर नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी नाणेकर प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे. सुभाष नाणेकर नगरसेवक झाल्यानंतर या भागात मोठा विकास होईल, असं त्यांच्या समर्थकांकडून निवडकीआधी बोललं जात होतं. नाणेकर यांचा विजय झाल्यामुळे या भागाचा विकास होईल का, हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा : कर्वेनगरमधील नदीपात्रालगतच्या परिसरात पोलीस चौकी करा; नगरसेवक स्वप्नील दुधाने यांची पोलीस आयुक्तांकडे मागणी

Web Title: Corporator subhash nanekar has made a major demand by submitting a representation to the municipal commissioner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • BJP
  • maharashta
  • Pune mahapalika
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.