कलाकारांवर बंधनं का ? कुणाल कामराच्या प्रकरणावर वैभव नाईक यांची संतप्त प्रतिक्रिया
उद्धव ठाकरेंवरती भाजपचे नेते आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते ज्या पद्धतीने बोलतात त्यावेळी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं.मग हे असं का? न्याय सगळ्यांना एकसारखाच मिळाला पाहिजे ! असा सवाल वैभव नाईक यांनी केला आहे. कुणाल कामरा याने ब्रॉडकास्टिंग मधून भूमिका मांडली ती लोकांसमोर आहे. आपल्या पक्षाच्या नेत्यांबद्दल बोलल्यानंतर जी प्रतिक्रिया दिलेली आहे ती पूर्णपणे चुकीची आहे. न्याय सगळ्यांना एकसारखाच मिळाला पाहिजे. उद्धव ठाकरेंवरती भाजपचे नेते आणि शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते ज्या पद्धतीने बोलतात त्यावेळी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं. एखाद्या कलाकाराने आपल्या व्यंगनात्मक खरी परिस्थिती सांगितल्यानंतर आक्षेप घेतला जातो. त्याला फिरू दिल जात नाही. त्यांच्या या स्वतंत्र्यावर घाला आहे. याबाबत गृहखात्याने ठोस भूमिका घेतली पाहिजे.