
मेट्रोमध्ये रिल्स करतानाचे व्हिडिओ हल्ली सोशल मिडियावर खूप दिसतात. नुकताच असाच एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होतोय ज्यामध्ये एक तरुणी रिकाम्या मेट्रो कोचच्या हँडरेल्सवर नाचतानाचा दिसतेय. व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे. मात्र, युझर्स या व्हिडिओवरुन तिला खुप ट्रोल करत आहेत.
[read_also content=”एयर इंडियाच्या फ्लाईटमध्ये महिलेच्या अंगावर लघवी करणारा शंकर मिश्रा अखेर अटकेत! बंगळुरुत पोलिसांनी केली कारवाई https://www.navarashtra.com/india/shankar-mishra-who-urinated-on-a-woman-in-an-air-india-flight-was-finally-arrested-bangalore-police-took-action-nrps-359845.html”]
हा व्हिडिओ अपर्णा देवयाल नावाच्या तरुणीने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. सार्वजनिक वाहतुकीत प्रवास करताना असे वागल्यामुळे लोकांनी त्याच्या कृत्याला विचित्र म्हटले आहे. हा व्हायरल व्हिडिओ अपर्णा देवयालने 25 डिसेंबर रोजी शेअर केला होता. या छोट्या व्हिडिओध्ये अपर्णा मेट्रोमध्ये रेलिंगवर डोलताना दिसत आहे. एव्हढ्या वरच न थांबता ती मेट्रोतल्या सिसिटिव्ही कडे कॅमेरालाकडे पाहुन चुंबन देते. रिकाम्या कोचमध्ये सीटच्या वरच्या बाजूला हा डान्स व्हिडिओ तिच्या मैत्रिणीने रेकॉर्ड केला आहे.
हा व्हिडिओ ऑनलाइन शेअर केल्यानंतर 4 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अपर्णाच्या या व्हिडिओवर इंस्टाग्राम युझर्सने तिच्यावर टीका केली. एका यूजरने लिहिले की, “मेट्रो प्रशासनाने त्याच्यावर कठोर कारवाई करावी.” तर, दुसर्या एका वापरकर्त्याने म्हण्टलं की, ” मेट्रेमधील ते आसन शारीरिकदृष्ट्या विकलांगांसाठी आहे, मानसिकदृष्ट्या विकलांगांसाठी नाही.”