mia khalifa viral poster
सोशल मीडियावर नेहमीच काही तरी विचित्र गोष्टी व्हायरल होत असतात, जे पाहून कधी आपले हसू अनावर होते तर कधी आपल्याला आश्चर्याचा धक्का मिळतो. आता सध्या कोणता व्हिडिओ नाही तर गावच्या जत्रेतील एक पोस्टर व्हायरल झाले आहे. गावचे पोस्टर नेहमीच हास्यापद असतात मात्र सध्या जे पोस्टर व्हायरल होत आहे, ते पाहून तुम्हाला हसू आणि आश्चर्य दोन्ही एकाच वेळी येईल. पोस्टरवर ज्याचा फोटो लावण्यात आला आहे, त्याचा कोणी स्वप्नातही विचार केला नसावा.
व्हायरल पोस्टरविषयी बोलणं केलं तर यात कोणी ग्रामस्थ मंडळी किंवा कोणी फिल्मस्टार नाही तर चक्क माजी ॲडल्ट स्टार मिया खलिफाचा फोटो लावण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तमिळनाडूतील एका उत्सवाच्या निमित्ताने होर्डींग लावण्यात आले होते. मात्र यावर मिया खलिफाचा फोटो पाहून अनेकजण आता आवाक् झाले आहेत. एवढेच काय तर या पोस्टरमध्ये एडिटिंग करून मियाला भारतीय साज रूपात दाखवण्यात आले आहे. फोटोत मिया सोज्वळ रुपात, डोक्यावर दुधाचा हंडा घेतलेली मिया खलिफा होर्डींगवर दिसत आहे. मात्र तिचा हा फोटो इथे का वापरण्यात आला असावा असा प्रश्न आता होर्डींग पाहणाऱ्याला पडतो आहे.
हेदेखील वाचा – धक्कादायक! कारच्या सनरूफवर कपल्सचा खुलेआम रोमान्स, Video Viral
पार्वतीचा अवतार समजल्या जाणाऱ्या अम्मन देवीचा उत्सव म्हणून तमिळनाडूतील मंदिरांमध्ये आदी पेरुक्कू उत्सव साजरा केला जातो. तमिळनाडूतील कुरुविमलाईमध्ये, नागथम्मन आणि सेल्ल्याम्मन मंदिरे उत्सवाच्या निमित्ताने सजवली जातात. या उत्सवाच्या निमित्ताने ठिकठिकाणी होर्डीग उभारली जातात. उत्सवासाठी उभारण्यात आलेल्या अनेक होर्डीग्सपैकी एका होर्डीगवर अनेकांची नजर खिळून राहिली. बारकाईने पाहिल्यानंतर हा फोटो मिया खलिफाचा असल्याचेच दिसून आले.
Kuruvimalai, Tamil Nadu: An image of Mia Khalifa was used on a hoarding for the Aadi Perukku festival carrying a traditional milk vessel. Magaral Police Station removed the hoarding pic.twitter.com/xYRcuJqIOb
— IANS (@ians_india) August 8, 2024
याचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर शेअर करण्यात आला असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. या खळबळजनक पोस्टरला पाहून आता अनेकजण संताप व्यक्त करत आहेत. दरम्यान स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाची दाखल घेतली आहे. प्रशासनाला ही बाब समजताच लगोलाग हे पोस्टर आता हटवण्यात आले आहेत. मात्र असे कोणी केले आणि यामागचा नक्की उद्देश्य काय होता, हे अद्याप समजू शकले नाही.