सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. यातील अनेक व्हिडिओज आपल्याला हसवतात तर काही आपल्याला थक्क करून जातात. सध्या सोशल मीडियावर आणखीन एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक कपल चक्क चारचाकी गाडीच्या सनरूफवर अश्लील कृत्य करताना दिसत आह. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे. नक्की काय घडलंय ते सविस्तर जाणून घेऊयात.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे, जो तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत घडून आलेली घटना ही लखनऊमधील आहे. या व्हिडिओत एक कपल सर्व भान सोडून गाडीच्या सनरूफवर खुलेआम एकमेकांना किस करताना दिसत आहे. त्याचबरोबर यात त्यांचे इतर अश्लील चाळेदेखील असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ मागील एका चालकाने आपल्या गाडीतून शूट केल्याचे समजत आहे.
हेदेखील वाचा – देव तारी त्याला कोण मारी! फिरायला गेला अन् दगडांमध्ये दिसली चमत्कारी गोष्ट, पाहून सर्वच थक्क! Video Viral
हा व्हिडिओ @Anujjournalist9889 नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला, “लखनऊ : संस्कृती आणि शिष्टाचाराचे शहर गोमतीनगरसारखा भाग आता बदनाम होतोय. दंगलीनंतर प्रेमी युगुलांची अश्लीलता चव्हाट्यावर आली; १०९० चौक ते मुख्यमंत्री चौकापर्यंत हे कपल बिनधास्तपणे हे अश्लील कृत्य करीत राहिले. त्या वेळेस पोलिस गैरहजर होते. हे कृत्य UP 78 GB 0130 क्रमांकाच्या कारच्या सनरूफवर घडत होतं”, असे कॅप्शन देण्यात आले आहे.
लखनऊ:-तहज़ीब ओ अदब का शहर इन दिनों गोमतीनगर जैसे इलाकों में हो रहा बदनाम,हुड़दंगियों के बाद प्रेमी जोड़े की अश्लीलता आई सामने,1090 चौराहे से मुख्यमंत्री चौराहे तक बेखौफ करते रहे अश्लील हरकतें, पुलिस रहीं नदारद,UP 78 GB 0130 नंबर गाड़ी की रूफ पर हो रहीं आशिक़ी @lkopolice pic.twitter.com/TUnURn53SO
— Anujjournalist9889 (@anujjournalist1) August 6, 2024
या प्रकरणावर आता लखनऊ पोलिसांनी प्रतिक्रिया दिली आहे. पोलिसांनी आश्वासन दिले आहे की, या प्रकरणाचा सखोल तपास केला जाईल आणि या प्रकरणाच्या संदर्भात आवश्यक पावले उचलली जातील. आता या व्हायरल व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट्स करत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. दरम्यान दिवसेंदिवस असे प्रकरण फार वाढू लागले आहेत. याआधी हैदराबादमध्ये अशी घटना घडून आल्याचे समोर आले होते.