प्रेमासाठी काही पण! बायको छतावरून खाली पडताच नवऱ्याने केलं असं... धडकी भरवणारा Video Viral
सोशल मीडियावर अनेक वेगवगेळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला धक्का देतात कधी हसवतात तर कधी अंगावर काटा देखील आणतात. यात बऱ्याचदा काही अपघातांचे व्हिडिओ देखील शेअर केले जातात. यात कधी कोणाला गंभीर दुखापत होते तर कधी कोणी जीवाला मुकतात. सध्या सोशल मीडियावर अशाच एका धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून आला आहे. यात एक महिला आपल्या घरातील छतावरून खाली जमिनीवर जोरदार आदळताना दिसून येत आहे. मात्र विशेष म्हणजे, यानंतर तिचा नवरा जे करतो ते पाहून अनेकांना आता आश्चर्याचा धक्का बसला आहे.
नवरा बायकोच नातं हे फार नाजूक आणि प्रेमळ असत. याला एक पवित्र बंधन देखील मानले जाते. यात प्रेम, जिव्हाळा, काळजी अशा अनेक गोष्टी असतात. आपल्या डोळ्यासमोर जर आपल्या जोडीदाराच्या जीवाचे काही वाईट झालं तर कोणाच्याही पायाखालची जमीन हादरले. तुम्ही विचार करा तुमच्यासोबत असे काही झाले तर सर्वात पहिले तुम्ही काय कराल? सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मात्र आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी तिचा नवरा जे करतो ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल. आपल्या पत्नीचा अपघात झाल्याचे पाहून तिचा नवरा रडत किंवा दुःख करत बसत नाही तर तिच्या पाठोपाठ तोही आपल्या जीवाची पर्वा न करत आपल्या पाटील वाचवण्यासाठी थेट छतावरून खाली उडी मारतो.
हेदेखील वाचा – सापाने चावताच तरुणाने केलं असं… पाहून तुमच्याही अंगावर काटा येईल, Video Viral
काय आहे व्हिडिओत?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक महिला आपल्या घराच्या छतावरून खाली कोसळताना दिसून येत आहे. उंचावरून खाली कोसळताना महिलेचं डोकं जोरदार जमिनीवर आपटत. यानंतर क्षणाचाही विलंब न करता तिचा नवरादेखील छतावरून उडी मारतो आणि पत्नीला वाचवण्यासाठी आपला जीव पणाला लावतो. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आपल्या बायकोला वाचवण्यासाठी नवऱ्याने ज्या प्रकारे आपला जीव धोक्यात टाकला त्याला पाहून आता अनेकजण या व्यक्तीच्या धाडसाची मनभरून प्रशंसा करत आहेत.
हेदेखील वाचा – मुंगूस आणि कुत्र्यांमध्ये झाले युद्ध, कोण कोणावर पडले भारी? थरारक लढतीचा Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @billionairephase नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘प्रेमाची ताकद’ असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओला 3 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी व्हिडिओवर कमेंट्स करत घटनेवर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “ती फार वाईट पडली. आशा आहे की ती ठीक असेल…” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “”सोबत जगा, एकत्र मरा” ची खरी व्याख्या”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.