सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. तुम्ही सोशल मीडिया साइट्सवर ऍक्टिव्ह असाल तर ते व्हिडिओ तुमच्या फीडवर नक्कीच दिसतील. कधी भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होतो तर कधी रीलच्या निमित्ताने विचित्र कृत्य करणाऱ्या लोकांचा व्हिडिओ व्हायरल होतो. याशिवाय जुगाड, स्टंट आदींचे व्हिडिओही व्हायरल होत असतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला थक्क करतात, कधी आपल्याला हसवतात तर कधी आपल्या अंगावर काटा आणतात. मात्र सध्या एका मजेशीर लढतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तुम्ही आतापर्यंत प्राण्यांमधील लढतीचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर पाहिले असतील. यात बहुतेकदा वाघ, सिंह, मगर यांच्या शिकाऱ्याची दृश्ये दिसत असतात. मात्र तुम्ही कधी मुंगूस आणि श्वानांमध्ये झालेलं युद्ध पाहिलं आहे का? जर नाही तर आज तुम्हाला ते पाहता येणार आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये मुंगूस विरुद्ध कुत्र्यांचा ग्रुप दिसत आहे. यांच्या या लढतीत नक्की विजय कोणाचा होतो आणि कोण कोणावर भारी पडतो? चला जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – एक चूक अन् थेट मृत्यूचे दार! बिहारमधील रेल्वे कर्मचाऱ्याचा बोगी आणि इंजिनमध्ये चिरडून मृत्यू, धक्कादायक Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक शेत भाताने भरलेले आहे आणि ते पूर्णपणे पाण्याने भरले आहे, तेव्हा तीन कुत्रे तेथे येतात आणि एक मुंगूस त्या शेतात आधीच बसला आहे. काही वेळातच कुत्रे मुंगूसवर हल्ला करू लागतात. तिन्ही कुत्रे आळीपाळीने मुंगूसला आपल्या दातांनी उचलतात आणि फेकायला लागतात. यानंतर मुंगूस रागाने त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी धावत असताना कुत्रे मागे पळू लागतात. यानंतर, एक कुत्रा पुन्हा तो मुंगूस उचलतो आणि फेकतो आणि मग मुंगूस हल्ला करण्यासाठी धावतो तेव्हा कुत्रा आपला जीव वाचवण्यासाठी पळून जातो. हा मजेदार व्हिडिओ पाहून लोक हसू लागले. मुंगूस आणि कुत्र्यांच्या या मजेदार युद्धाचा युजर्सने फार आनंद लुटला आहे.
गलत पंगा ले लिया इन्होंने
अब ये इनको मजा चखा के जाएगा🤣 pic.twitter.com/S2PM3imEwS— Moj Clips (@MojClips) November 9, 2024
हेदेखील वाचा – अजबच! 4 लाखांचा खर्च अन् 1500 लोकांच्या उपस्थितीत कुटुंबाने आपल्या लकी कारचे केले अंत्यसंस्कार, Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @MojClips नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘चुकीचा पंगा घेतला त्यांनी, आता हा त्यांना मजा चाखवणार’. व्हिडिओवर आतापर्यंत अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा मुंगूस तुम्हाला लवकर सोडणार नाही, हे प्राणी खूप हट्टी असतात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “विचार करून पंगा घ्यायला हवा”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.