आसाम यूनिवर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी पकडला चक्क 100 किलोचा विशालकाय अजगर, पाहून तुमचाही उडेल थरकाप, Video Viral
सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात काही प्राण्यांचे व्हिडिओ देखील सामील असतात. यातील दृश्ये अनेकदा आपल्या अंगावर काटा आणतात. सध्या असाच एक भितीदायक व्हिडिओसोशल मीडियावर व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये काही मुले हातात एक महाकाय अजगर घेऊन दिसून येत आहेत. विशेष म्हणजे, हा अजगर इतका भयानक आणि विशाल आहे की त्याला पाहिल्यानंतर कोणाचाही थरकाप उडेल. नक्की काय प्रकरण आहे? चला जाणून घेऊयात.
अजगर हा मुळातच एक थरारक आणि भयावह प्राणी आहे. आपल्या विशाल लांबीच्या शरीराने तो क्षणार्धात आपल्या शिकारीला गिळून मृत्यूच्या दारी पोहचवतो. त्याचा वार फार भयानक असतो ज्यामुळे त्याला सर्वच घाबरून असतात. अजगर हे बहुतेकदा जंगलात आढळून येतात. मानवी वस्तीत त्यांचे वास्तव फार कमी झाले आहे ज्यामुळे त्याला असे मानवी वस्तीत पाहणे कोणासाठीही धक्कादायक ठरू शकते. ज्याचे नाव काढताच अनेकांचे हाथ थरथर कापू लागतात अशा या अजगराला काही विद्यार्थ्यांनी मोठ्या धैर्याने पकडले. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यातील दृश्ये तुम्हाला थक्क करतील. व्हायरल व्हिडिओबाबत अनेक मीडिया रिपोर्ट्सही समोर आले आहेत. ज्यामध्ये हे प्रकरण आसाम विद्यापीठाच्या सिलचर कॅम्पसचे असल्याचे सांगण्यात आले आहे. जिथे वनविभागाच्या टीमसह विद्यार्थ्यांनी या महाकाय अजगराला पकडले आहे.
नशीबच फुटकं त्याला काय करणार! तरुणींची मदत करायला गेला अन् होत्याच नव्हतं करून बसला, Video Viral
काय आहे प्रकरण?
हा अजगर 17 फूट लांब आणि 100 किलो वजनाचा असल्याचे सांगण्यात येत आहे. जे पहिल्यांदा 18 डिसेंबरला आसाम युनिव्हर्सिटी कॅम्पसमधील गर्ल्स हॉस्टेल नंबर 1 जवळ दिसले होते. या महाकाय अजगराला पाहण्यासाठी कॅम्पसमधील विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर ही माहिती मिळताच संपूर्ण विद्यापीठात घबराटीचे वातावरण पसरले. कॉलेज कॅम्पसमध्ये अजगर घुसल्याची माहिती बराक व्हॅली वन्यजीव विभागाला देण्यात आली. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने अजगराला पकडले. बराक व्हॅली वन्यजीव अधिकाऱ्यांनी नंतर पुष्टी केली की अजगर सुरक्षितपणे त्याच्या योग्य अधिवासात हलवण्यात आला आहे.
17 feet long
Almost 100kg
Probable species-
Burmese python
Assam University Silchar
Once in a lifetime beauty ❤️ #Christmas gift from nature
Living in a #Wildlife pic.twitter.com/451tMUG32F— Priyanka Roy (@Priyanka2110118) December 18, 2024
अधिका-यांनी सांगितले की, अजगर विद्यापीठातील एक मोठी बकरी खाऊन जंगलात परतताना दिसला. त्यानंतर त्या अजगराला पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्यात विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना यश आले. विशाल अजगराच्या हा व्हिडिओ @Priyanka2110118 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओतील इतका मोठा अजगर पाहून अनेकजण हैराण झाले असून आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.’
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.