सोशल मीडियावर आजवर अनेक अपघातांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत मात्र सध्या जो व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तो तुम्हाला अक्षरशः हादरवून टाकेल. अपघातांचे थरारक व्हिडिओ याआधी अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळाले. यात रस्ते अपघातांचा अधिकतर समावेश असतो. आपल्या एका चुकीमुळे लोक स्वतःच्या आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात टाकतात. याचीच प्रचिती देणारा एक व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला आहे . यात अपघाताचे एक भीषण रूप पाहायला मिळाले. व्हिडिओतील दृश्ये तुम्हाला हैराण करतील.
ताजनगरी आग्रातून एक व्हिडिओ समोर आला ज्याला पाहून लोकांच्या अंगावर काटा आला आहे. येथे महामार्गावर एका ट्रक चालकाने दोन जण कारखाली अडकल्यानंतर त्यांना सुमारे 500 मीटरपर्यंत ओढत आणले. यावेळी ट्रकखाली अडकलेले दोघे तरुण आरडाओरडा करत होते मात्र आश्चर्याची बाब म्हणजे तरीही हा ट्रक चालक त्या दोघांना रस्त्यावर फरफटत राहिला. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून यातील दृश्ये पाहून आता अनेकांच्या अंगावर काटा येत आहे. नक्की काय घडले ते जाणून घेऊयात.
तुझा बाप आहे मी! सिंहाचं पिल्लू देत होतं वडिलांना त्रास, तितक्यात सिंहाने केलं असं… Video Viral
नक्की काय घडले?
या घटनेत पुढे स्थानिक लोकांनी चालकाला ट्रक थांबवण्यास भाग पाडले आणि बंपरमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. पोलिसांनी चालकाला अटक केली असून ट्रक जप्त करण्यात आला आहे. ही घटना 21 डिसेंबर रोजी घडली होती, ज्याचा व्हिडिओ आता समोर आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रब्बी आणि झाकीर अशी पीडितांची नावे आहेत. जेवण करून दोघेही दुचाकीवरून परतत होते. आग्रा येथील रामबाग चौकात यू टर्न घेत असताना एका ट्रकने त्यांना धडक दिली. ट्रकला धडक दिल्यानंतर दोन्ही भाऊ ट्रकच्या पुढील भागात अडकले. परंतु, माहिती असूनही ट्रकचालकाने वाहन न थांबवल्याने दोघेही ओढतच राहिले. ट्रकचालकाने दोन्ही भावांना 500 मीटरपर्यंत ओढत नेले. ट्रकच्या चाकाखाली येऊ नये म्हणून दोघांनीही बंपर पकडून आरडाओरड केली.
HORRIFYING!
In Agra, a truck driver dragged two men for 300 meters. Locals intervened, stopping the truck and saving the men. Both are stable but continue receiving treatment. The driver has been arrested and the truck seized.
— Sanjay Kishore (@saintkishore) December 23, 2024
आजी-आजोबांच्या शोकसभेत आयटम सॉंगवर नाचू लागली तरुणी, युजर्स भडकले म्हणाले आईची आत्मा… Video Viral
दोन जण बंपरमध्ये अडकलेले आणि ओढत असल्याचे पाहून तेथून जाणाऱ्या लोकांनी ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र चालकाने ट्रक पळवून नेला. ट्रक थांबवण्यासाठी काही ऑटोचालकांनी त्यांच्या गाड्या समोर लावल्या. बऱ्याच प्रयत्नांनंतर चालकाने गाडी थांबवली मात्र नंतर त्याला स्थानिक लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. लोकांनी चालकालाही मारहाण केली. या भीषण अपघातात दोन्ही भावांनाही गंभीर दुखापत झाली आहे. या दोघांच्या हाडांचाही चक्काचूर झाला आहे. मात्र, योगायोगाने रब्बी आणि झाकीरचे प्राण वाचले. सध्या दोघांवर उपचार सुरू आहेत. चालकाला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. चालक दीपक हा फिरोजाबादमधील नागला बीचचा रहिवासी आहे. दरम्यान या थरारक घटनेचा व्हिडिओ @saintkishore नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.