निष्काळजीपणाचा कहर! एक चूक अन् चिमुकली आगीच्या विळख्यात, होरपळत राहिला जीव... घटनेचा थरारक Video Viral
लहान मुलं ही तळहाताच्या फोडासारखी असतात, त्यांना नेहमी काळजीपूर्वक जपायला हवं. लहान मुलांचे जग हे आपल्या जगाहून फार वेगळे असते, ते आपल्याच दुनियेत रमलेले असतात आणि हळूहळू गोष्टी समजून शिकून घेण्याचा प्रयत्न करत असतात. अशात त्याच्यावर प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवणे फार महत्त्वाचे ठरते अन्यथा काही दुर्घटना होण्याची शक्यता असते. बाहेरच काय तर बऱ्याचदा घरातही त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी एका व्यक्तीला आपण त्याच्या पाठोपाठ लावलेलं असत. मात्र असे न केल्यास अनेकदा गोष्टी चिमुकल्यांचा जीवावर बेतल्याचे दिसून येते.
आपली एक चूक त्यांना गंभीर दुखापत किंवा त्यांच्या जीवावर देखील बेतू शकते. अशा दुर्घटनांचे प्रकार दिवसेंदिवस समोर येत असतात, ज्यामुळे तुम्ही पालक असाल तर तुम्ही या गोष्टीकडे विशेष लक्ष द्यायला हवे. सध्या यासंबंधीचाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसून येत आहे. यात व्यक्तीच्या एका चुकीमुळे चिमुकलीच्या अंगावर आग पडल्याचे दिसून येते. व्हिडिओतील दृश्ये तुमच्या अंगावर काटा आणण्यासाठी पुरेशी आहेत. नेमकं काय घडलं ते जाणून घेऊयात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
काय आहे प्रकरण?
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, एका घराबाहेरील अंगणातील दृश्ये दिसत आहेत. यात काही लोक चटई पसरून त्यावर एक चिमुकली बसल्याचे दिसून येते. इथे काही लोक जेवणाची तयारी करत असतात. तेवढ्यात तिथे अचानक आगीचा उडतो आणि समोर बसलेल्या चिमुकलीच्या अंगावर जाऊन कोसळतो. यामुळे त्या चिमुकलीच्या मुलीच्या ड्रेसला आग लागते. ही सर्व घटना अवघ्या काही सेकंदातच पार पडते. ती आगीत होरपळत असल्याचे पाहून तेथील लोक त्वरित तिच्याकडे धाव घेतात आणि तिच्या ड्रेसला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न करतात. ते तिला तेथून उचलतात आणि दुसऱ्या ठिकाणी घेऊन जातात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
आगीच्या या थरार घटनेचा व्हिडिओ @nimbahera.update नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 22 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे तसेच अनेकांनी कमेंट्स करत या घटनेवर आपले मत देखील मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “लहान मुलांची काळजी घ्या” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे कसं घडलं यार” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हे खोटं आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.