सध्या रस्ते अपघाताचे प्रमाण फार वाढले आहेत. येत्या काळात अनेक रस्ते अपघाताच्या बातम्या समोर आल्या. बऱ्याचदा या अपघातांचे थरारक व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले जातात. यातील दृश्ये पाहता अनेकांच्या अंगावर काटा येतो. चालू रस्त्यावर गाडी चालवताना नेहमी रस्ते नियमांचे पालन करण्याचा सल्ला जातो मात्र तरीही काही चालक या नियमांचे पालन करत नाही आणि अपघाताला बळी पडतात. आपण केलेली एक शुल्लक चूक आपल्याच काय तर समोरच्या जीवावर देखील बेतू शकते. सध्या याचीही प्रचिती देणाऱ्या एका भीषण अपघातचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे. यातील अपघाताचे दृश्य आणि तरुणाची झालेली अवस्था तुम्हाला हैराण करेल.
सध्या सोशल मीडियावर एका भयाण अपघातच व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. यात व्यक्तीची बाइक ट्रकखाली अक्षरशः चिरडून निघाल्याचे दिसून येते. एवढेच काय तर नंतर ही बाईक पेट देखील घेते ज्यात व्यक्तीचा जीव होरपळून निघतो. ही सर्व घटना इतकी भयाण आहे की ती पाहून आता अनेकांना आश्चर्याचा धक्का बसत आहे. तरुणाची ती घालमेल आणि आगीन तडफडणारा त्याचा तो जीव हे सर्वच फार भीषण आहे. हे सर्व कधी आणि कसं घडलं याविषयी सविस्तर जाणून घेऊयात.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
काय आहे व्हिडिओत?
ही सर्व घटना हैदराबाद महानगर प्रदेशातील तुपरान परिसरात असलेल्या नरसापूर चौकात घडून आली. व्हायरल व्हिडिओमध्ये अपघाताचे दृश्य स्पष्ट दिसून येते. यात चालू रस्त्यावरचे दृश्य दिसत आहे. एक बाईक रस्त्यावर चालत असताना अचानक मागून भरधाव वेगात एक ट्रक येतो आणि त्याला चिरडून पुढे जातो. ही अवघ्या काही सेकंदात घडते. गोष्ट इथेच संपत नाही तर पुढच्याच क्षणी बाईक पेट घेते आणि या ज्वलंत आगीच्या झळाक्यात तरुणाचा जीव होरपळून निघतो. आपला जीव वाचवण्यासाठी तो या आगीतून बाहेर पडतो यावेळी त्याला संपूर्ण शरीराला आग लागलेली असते. तो या आगीला विझविण्याचा प्रयत्न करतो, त्याची ही अवस्था पाहून आजूबाजूची लोक तरुणाच्या मदतीसाठी धाव घेतात. ही घटना जवळील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
సీసీటీవీ ఫుటేజ్.. షాకింగ్ వీడియో
మెదక్ జిల్లా తూప్రాన్ పట్టణంలోని నర్సాపూర్ చౌరస్తా వద్ద బైక్ను ఢీకొట్టి పైనుండి వెళ్లిన టిప్పర్
ప్రమాదంలో బైక్ పూర్తిగా దగ్ధం.. బైక్పై ఉన్న దశరథ్కు తీవ్రగాయాలు, ఆసుపత్రికి తరలింపు pic.twitter.com/BmxkquuxpO
— Telugu Scribe (@TeluguScribe) December 3, 2024
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भीषण अपघाताचा हा व्हिडिओ @TeluguScribe नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘मेडक जिल्ह्यातील थुपरन शहरातील नरसापूर चौकात दुचाकीला धडक दिल्याने अपघातात दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली असे लिहिण्यात आले आहे. या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “टिपर नाही सिग्नलसाठी सुरक्षिततेचे उपाय कुठे आहेत आणि हे सामान्य आहे की दुचाकी वाहनांनी नेहमी धोका पत्करून अवजड वाहने ओलांडली पाहिजेत” दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “माणुसकी अजून जिवंत आहे, काही लोक व्हिडिओ काढण्याऐवजी त्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.