मित्र आहे की वैरी! लग्नमंडपात आला, कानात कुजबुजला अन् क्षणार्धात मोडलं लग्न; धक्कादायक Video Viral
जेव्हा मुलगा आणि मुलगी एकमेकांशी लग्न करण्याचा निर्णय घेतात तेव्हा त्यांच्यामध्ये विश्वास आणि आत्मविश्वास असणे खूप महत्वाचे आहे. जर एकमेकांवर विश्वास नसेल तर ते लग्न टिकणे खूप कठीण आहे. कदाचित या विश्वासाच्या आणि आत्मविश्वासाच्या अभावामुळेच जगभरात घटस्फोटाच्या घटना वाढत आहेत. अनेक वेळा मंडपातही विश्वास नसल्यामुळे लग्न मोडतात. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडिओ दाखवणार आहोत जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये लग्नादरम्यान अचानक वराचा मित्र मंडपात पोहोचतो. तो वराच्या कानात अशी कुजबुजतो की वधूचे कान टवकारतात. वधू ताबडतोब भांडणे सुरू करते आणि शेवटी लग्नच मोडते. नक्की काय घडते ते जाणून घेऊयात.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतः पाहू शकता की, जयमालानंतर वधू-वर मंडपात बसले आहेत. वधू तिच्या बहिणीशी बोलत आहे, जेव्हा वराचा मित्र येतो. तो हळूवारपणे वधूवर काही पैसे ठेवतो. यानंतर तो वराला पैसेही देतो. दरम्यान, तो वराच्या कानात काहीतरी कुजबुजायला जातो. वराचा मित्र म्हणतो काय झालं भाऊ, त्यांनी रशियन मुलीला लग्नाआधी घरी बोलावलं होतं. वधूने या मित्राचे विधान ऐकले. यानंतर तिने केलेला गोंधळ पाहून वरालाही भीती वाटू लागते. वधूने रशियनऐवजी गर्लफ्रेंड शब्द ऐकलं. अशा स्थितीत ती स्टेजवरच्या वराला विचारू लागते, काय बोलावे, गर्लफ्रेंडचा काय अर्थ आहे? लग्नाआधीही तुम्ही माझ्याशी इतकी वर्षे बोलत होता, मग ही गर्लफ्रेंड कोण?
वर समजावून सांगतो की आम्ही लग्न करणार आहोत, या गोष्टींकडे लक्ष देऊ नको मात्र वधू भडकते आणि म्हणते की, तुझे दुसऱ्या मुलीशी प्रेमसंबंध असताना माझ्याशी लग्न का केले? वराचा मित्र काही कमी नाही, उलट तो त्याला काहीतरी पैसे देण्यास सांगतो. हे ऐकून वधूला आणखी राग येतो आणि ती म्हणते की तिला आता लग्न नाही करायचे. यानंतर, वराचा मित्र आगीत इंधन घालतो आणि म्हणतो भाऊ काय असेल ते एकदाच सांगून टाक. लग्नाआधी क्लिअर कर, नाहीतर नंतर आणखीन भांडण होतील. मात्र वराला ही सिचुएशन कशी हँडल करावी ते सुचत नाही आणि मग तो डोक्यावर हात लावून बसतो. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा सर्व प्रकार कोणत्या चित्रपटाच्या सीनहून कमी वाटत नाही.
दोस्त ने शादी तुड़वा दी😭 pic.twitter.com/zlTiHOATfA
— Arpit Kushwah (@ArpitKushwah3) January 14, 2025
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @ArpitKushwah3 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, मित्राने मोडले लग्न’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स देखील केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अरे यार हे स्क्रिप्टेड आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “शत्रूही करणार नाही असे काम मित्राने केले आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.