(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
ट्रेनचा प्रवास हे सामान्यांच्या आयुष्याचे एक रोजचे समीकरण झाले आहे. रोज लाखोंच्या संख्येने लोक ट्रेनने प्रवास करत असतात. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले लोक ट्रेनच्या प्रवासाला जास्त प्राधान्य देतात. कामाच्या गडबडीत आणि या धाकधुकीच्या जीवनात ट्रेनमध्ये अनेकांची अनेकांशी ओळख होते. यात कधी चांगले नातेसंबंध निर्माण होतात तर कधी रुसवे फुगवे सुरु होतात. तुम्हीही ट्रेनचा प्रवास करत असाल तर भांडण हे तुमच्यासाठी काही नवीन नसेल. ट्रेनमध्ये वादाची ठिणगी पेटायला काही वेळ लागत नाही. त्यातही महिलांची भांडण म्हणजे काही खरे नाही.
सध्या सोशल मीडियावर अशाच एका भांडणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात दोन महिला एकमेकींशी अक्षरशः एका वैरिणीप्रमाणे भांडताना दिसून आल्या. त्यांचे हे भांडण इतके भीषण होते की ते पाहून ट्रेनच्या टीसीलाही त्यांच्यात हस्तक्षेप करावा लागला. हे भांडण इतकं भीषण होत की, ट्रेनमधील कोणीही हे भांडण रोखण्याचा प्रयत्न केला नाही. साध्या बाचाबाचीतून सुरु झालेल्या या वादाचे रूपांतर क्षणार्धात भयंकर मारामारीत झाले. या मारामारीत दोन्ही महिलांनी अक्षरशः एकमेकींना झोडपडून काढलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तेथील एका व्यक्तीने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला आणि नंतर तो सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ शेअर होताच तो फार कमी वेळेत सोशल मीडियावर व्हायरल झाला. व्हिडिओत नक्की काय घडले ते जाणून घेऊयात.
काय घडले व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात दोन महिला मारामारी करताना दिसत आहेत. मुख्य म्हणजे या मारामारीत त्या इतक्या व्यस्त होतात की स्वतःचे भान हरपून बसतात. आपल्या मर्यादा ओलांडत त्या अक्षरशः एकमेकींचे केस उपटतात, साड्या खेचतात. हाणामारीचे हे भीषण दृश्य इतके भयानक वळण घेते की पाहून तेथील सर्वच लोक हैराण होतात. अखेर टीसीलाच यात मध्यस्ती घ्यावी लागते आणि या महिलांपासून एकमेकींना दूर करावे लागते.
महिलांच्या या हाणामारीचा व्हिडिओ @sanjaykumar373136kalu नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘जनरल ट्रेनचा व्हिडीओ” असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अनेकांनी कमेंट्स करत महिलांच्या या मारामारीवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे लोक कुंभस्नानासाठी प्रयागराजला जात आहेत का?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “आजपासून AC कोचमध्ये जाणे बंद”
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.