Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! आईच्या डोळ्यांसमोर मुलाच्या अंगावरून गेली कार, ती किंचाळत राहिली पण… Viral Video पाहून काळजात धडकी भरेल

Shocking Accident Video: सोशल मीडियावर एका धक्कादायक अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एका गाडीने चिमुकल्याला चिरडल्याचे दिसून येत आहे. आईचा आक्रोश अन् व्हिडिओतील दृश्ये तुमच्या अंगावर काटा आणतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 03, 2025 | 11:51 AM
धक्कादायक! आईच्या डोळ्यांसमोर मुलाच्या अंगावरून गेली कार, ती किंचाळत राहिली पण... Viral Video पाहून काळजात धडकी भरेल

धक्कादायक! आईच्या डोळ्यांसमोर मुलाच्या अंगावरून गेली कार, ती किंचाळत राहिली पण... Viral Video पाहून काळजात धडकी भरेल

Follow Us
Follow Us:

आई आणि तिच्या मुलाचं नातं फार निर्मळ आणि घट्ट असत. तळहाताच्या फोडाप्रमाणे आई आपल्या मुलांची काळजी घेत असते. आपल्या पोटात नऊ महिने वाढवलेल्या आपल्या बाळाशी ती अशाप्रकारे जोडली जाते की मुलाच्या वेदना काही अंशी तिलाही जाणवू लागतात. लहान-मोठ्या सगळ्या संकटांत ती आपल्या मुलांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. आपल्या मुलाला जरा जरी खरचटलं तरी आईचा जीव वर-खाली होऊ लागतो अशात आपल्याच डोळ्यांसमोर आपल्या मुलाच्या अंगावरून जर गाडी गेली तर त्या आईचे काय होत असेल याचा विचार करा…

सध्या सोशल मीडियावर अशाच एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याने सर्वांना हादरवून सोडले आहे. अनेकदा गाडी चालवताना चालकांना रस्ते नियमांचे पालन करण्याचे आवाहन दिले जाते मात्र सर्वच हे नियम पाळत नाही आणि मग स्वतःच्या आणि दुसऱ्याचाही जीव धोक्यात घालतात. रस्ते अपघातांचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर याआधीही व्हायरल झाले आहेत. आपला निष्काळजीपणा आपल्या जीवावर बेतू शकतो याचा विचार लोक करत नाही आणि मग विनाकारण मृत्यूला बळी पडतात. सध्याच्या या व्हायरल व्हिडिओत एका कारचालकाच्या चुकीमुळे एका आईचं लेकरू गाडीखाली आल्याचं दिसून येत आहे.

यमराजही काकांना घाबरत असेल…! सिलेंडरला आग लावून काका करू लागले काही असं… पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल

काय आहे व्हिडिओत?

सोशल मीडियावर व्हायरल या व्हिडिओत तुम्हाला दिसेल की, रस्त्याच्या कडेला एक आई आणि तीच लेकरू बसलं आहे. यावेळी तिथे एक कार रिव्हर्स घेत मागे येत असते. रिव्हर्स घेत असताना अचानक कार तिथे असलेल्या खांबाला आदळते आणि रस्त्याच्या कडेला बसलेल्या मुलाच्या अंगावरून जाते. हा धक्का इतका जोरदार असतो की यामुळे मागचा स्टँड देखील तुटून वेगळा होतो. आपल्या मुलाला गाडीने चिरडल्याचे हे दृश्य आई आपल्या उघड्या डोळ्यांनी बघते आणि दुसऱ्याच क्षणी त्याला वाचवायला पुढे धावते. सुदैवाने या घटनेत मुलाला फार दुखापत होत नाही आणि ती वाचतो. आपल्या मुलाला सुखरूप पाहून आईचा जीव हातात येतो आणि ती तात्काळ त्याला उचलत तेथून निघून जाते.

हलगर्जीपणा नडला! घराबाहेर बसलेल्या पापाच्या परीचा फोन चोरट्यांनी हिसकावला, Viral Video पाहून डोक्याला हाथ लावाल

या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @ganeshnishad1585 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला अनेकांनी पाहिले असून हजारोंनी याला लाइक्स देखील दिले आहेत. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत व्हिडिओवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “अरे बावळट मागे बघ ना मागे कुणाचं तरी कुटूंब बसलं आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हे सर्व काय झाले”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Car took reverse leads to little boy accident mother get panik shocking accident video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2025 | 11:51 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral accident video

संबंधित बातम्या

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
1

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
2

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
3

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.