दरोडा, चोरी, छेडछाडीचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. पण यावेळी समोर आलेला व्हिडिओ जरा खास आहे. या व्हिडिओतील दृश्ये पाहून तुमची तुमच्या डोक्याला हाथ लावाल. यामध्ये घराबाहेर बसून फोन वापरणाऱ्या तरुणीच्या हातातून दोन चोरटे फोन हिसकावून पळून जाताना दिसून येतात. मुख्य म्हणजे यावेळी मुलगी काहीही न करता हा सर्व प्रकार आपल्या उघड्या डोळ्यांनी बघत असते. मुलीची ही रिऍक्शन पाहून आता सोशल मीडिया युजर्स आवाक् झाले आहेत. नक्की काय आणि कसे घडले ते जाणून घेऊया.
सध्या या स्मार्टफोनच्या जगात लोक आपल्या फोनमध्ये इतके बुडून गेले आहेत की त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीचे भान राहत नाही. बऱ्याचदा लोक स्मार्टफोनच्या या व्यसनामुळे आपल्या आयुष्यात समस्या वाढवून घेतात. सध्याच्या व्हायरल व्हिडिओमध्येही असेच काहीसे घडल्याचे दिसून आले आहे. तुम्ही यात नीट पाहिले त तुम्हाला यात दिसेल की, एक मुलगी तिच्या घराबाहेर स्कूटरवर बसलेली आहे. यावेळी तिच्या हातात आपला फोन असतो आणि ती पूर्णपणे यात काहीतरी पाहत असते. अशातच तिथे दोन चोर आपल्या गाडीवर येतात आणि वेगाने तिच्या हातून फोन हिसकावून घेऊन जातात. घटनेच्या काही सेकंदांनंतर, मुलीला समजते की तिला लुटले गेले आहे, त्यानंतर ती आणि तिचा मित्र जोरात ओरडू लागतो.
यानंतर काही लोक घरातून बाहेरही येतात, पण तोपर्यंत खेळ संपलेला असतो. मुलीचे हजारो किमतीचे नुकसान करून दरोडेखोर पळून जातात आणि त्यांची सर्व बुद्धिमत्ता व्यर्थ राहते. युजर्स मात्र आता या व्हिडिओची फार मजा लूटत आहेत. अनेकजण म्हणत आहेत की दीदी आपला फोन हरवल्याबद्दल तितकी दु:खी नाही पण तिचा अनलॉक फोन हरवल्याबद्दल तिला जास्त चिंता वाटत आहे. तसेच अनेकजण तरुणीच्या निष्काळजीपणावर तिच्यावर टीका करत आहे.
She Took Two business days to React😭 pic.twitter.com/VUDylSEMCO
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) January 30, 2025
दरम्यान हा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘तिला प्रतिक्रिया देण्यासाठी दोन बिसनेस डेज लागले” असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला हजारो युजर्सने पाहिले असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तिला वाटले की एक प्रॅन्क आहे, तिला आशा होती की ते हसत हसत परत येतील पण असे काहीच झाले नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे,”विनाकारण ओढल्या जाण्यापासून तिने स्वतःला वाचवले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.