
लग्नसंमारंभात कमीत कमी लोकांच्या उपस्थितीला परवानगी असताना पश्चिम बंगालमध्ये 450 पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पडणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असला असेल की, हे कसं काय शक्य आहे. पण पश्चिम बंगालमधील संदीपन सरकार आणि अदिती दास यांच ऑनलाईन लग्न होणार आहे. ते सुध्दा कोणत्याही कोविड नियमाचे उल्लंघन न करता. Google Meet वर पाहुणे लग्नाला उपस्थित राहणार असून या पाहुण्यांसाठी झोमॅटोकडून जेवणही घरी पोहेचविण्यात येणार आहे. २४ जानेवारीला २४ जानेवारीला संदीपन सरकार आणि अदिती दास हे जोडपं ऑनलाईन लग्नगाठ बांधणार आहे.
[read_also content=”उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ‘कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी करा’ https://www.navarashtra.com/pune/paschim-maharashtra/pune/strictly-enforce-corona-rules-says-dy-cm-ajit-pawar-nrka-224950.html”]
भारतात लग्नसमारंभ म्हण्टलं की कुटुंबिय, पाहुणे, मित्रमंडळी यांची मंदियाळी असते. मात्र गेल्या काही दिवसापासून भारतात करोनाने पुन्हा डोकं वर काढलयं त्यामुळे परत एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहे. थाटामाटात लग्न करु पाहणाऱ्या जोडप्याचं स्वप्न मात्र भंगलय. पश्चिम बंगालमधील एका जोडप्याने यावर एक भन्नाट युक्तीही शोधून काढली आहे. आपल्या पाहुण्यांच्या सुरक्षेची काळजी घेत आणि कोविड नियमांनुसार 200 हून अधिक लोकांना आमंत्रित करून नियमांचे उल्लंघन न करता, बर्दवानच्या या जोडप्याने Google Meet वर लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. पाहुण्यांना या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्लॅटफॉर्मवर लग्नाच्या थेट प्रक्षेपणाचा आनंद आपापल्या घरात आरामात बसून, Zomato चे जेवण घेता येणार आहे. सध्या सोशल मीडियावर या जोडप्याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.
२८ वर्षीय संदीपन सांगितलं की कोविडशी संबंधित समस्यांमुळे 4 दिवस रुग्णालयात दाखल असताना त्यांना डिजिटल लग्नाची कल्पना सुचली.
“मी माझ्या कुटुंबाच्या आणि पाहुण्यांच्या आरोग्याविषयी खूप काळजीत होतो. त्यामुळे मी हा निर्णय घेतला. लग्नाला कमीत कमी पाहुणे उपस्थित राहून हजेरी लावतील, तर 300 हून अधिक पाहुणे लग्नाचे थेट प्रक्षेपण पाहतील. आमंत्रित केलेल्या सर्व लोकांना लग्नाची लिंक आणि पासवर्ड लग्नाच्या एक दिवस आधी मिळेल. असेही संदीपनने सांगितलं.