अविश्वसनीय! च्विंगम प्रमाणे जिवंत कोंबडीला चघळू लागली गाय, थरारक दृश्ये पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, Video Viral
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. यात बऱ्याचदा काही हास्यास्पद व्हिडिओज, कधी कमालीचे जुगाड तर काही थरारक आणि जीवघेणे असे स्टंट्सचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ पाहून बऱ्याचदा लोक थक्क होतात मात्र लोक तितक्याच आवडीने हे व्हिडिओ पाहत देखील असतात ज्यामुळे बऱ्याचदा असे अंतरंगी व्हिडिओ सोशल मीडियावर फार कमी वेळात व्हायरल होतात. मात्र सध्या जो विडिओ व्हायरल झाला आहे, तो पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, यात एका गोठ्यातील दृश्ये दिसून येत आहेत. यात एका गायीला दोरीने बांधले आहे आणि अनेक कोंबड्या तिच्याभोवती फिरताना दिसत आहेत. सुरुवातीला हा व्हिडिओ तुम्हाला अगदी सामान्य वाटेल, पण पुढच्याच क्षणी एक धक्कादायक दृश्य समोर येते, जे सर्वांनाच हादरवून टाकते. यात तुम्हाला दिसेल की, गे अचानक ;पुढे येते आणि आपल्या तोंडाने एका कोंबडीवर निशाणा साधत तिचे तोंड आपल्या जबड्यात घेते. यानंतर ती जिवंत कोंबडीला आपल्या तोंडात घेऊन चघळू लागते.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
आपल्याकडे गायीला गौमातेचा दर्जा देण्यात आला आहे. ज्यामुळे सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओतील दृश्ये ही खरोखर धक्का देणारी आहेत, कारण सामान्यतः लोक गायींना शाकाहारी मानतात. गायीला आजवर सर्वांनी फक्त गावत आणि पालापाचोळा खाताना पाहिले आहे मात्र कोंबडीला आपल्या तोंडात घेताना मात्र गायीला प्रथमच सर्वांनी पाहिलं असावं. गायीचा हा पराक्रम पाहून आता अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
हा अद्भुत व्हिडिओ @discoverwildpaws नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘ओएमजी! व्हिडिओ शूट करणे थांबवा आणि त्या कोंबडीला वाचवा, हे सामान्य नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ती कोंबडीला एका च्विंगम प्रमाणे चघळत आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पण ती अस का करत आहे?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.