सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात, कधी रडवतात तर कधी आपल्याला आश्चर्याचा धक्का देऊन जातात. नुकताच सोशल मीडियावर एक थरारक आणि काळजात धस्स करून जाणारा एक अनोखा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यातील दृश्ये तुमचे काळीज हलवून टाकेल. काय आहे व्हिडिओत चला जाणून घेऊयात.
आई होणे ही जगातील प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात सुंदर भावना असते. माणूस असो वा प्राणी, प्रत्येक आई आपल्या मुलाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करते. जगात आल्यानंतर प्रत्येक संकटापासून आपल्या मुलाचे रक्षण करणे ही आईची जबाबदारी बनते. आई गर्भापासूनच स्वतःला मुलाशी जोडते. अशा परिस्थितीत एखाद्या आईला पोटातच मूल गमवावे लागले, तर तिचे दु:ख व्यक्त करणे सर्वात कठीण गोष्ट आहे. आजचा आपला व्हायरल व्हिडिओ आहे अशाच एका गोष्टीशी निगडित आहे.
काय आहे व्हिडिओत?
एका गर्भपात झालेल्या आईच्या पोटातील बाळाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. मात्र यात कोणत्या मानवाच्या मुलाचा नाही तर म्हशीच्या भ्रूणाचे थरारक दृश्य दिसून येत आहे. मृत गर्भाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर एका शेतकऱ्याने शेअर केला आहे. यातील दृश्य तुम्हाला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी पुरेसे आहे. म्हशीचे बाळ जन्माला आले की लगेच आपल्या पायावर उभे राहते. अवघ्या अडीच महिन्यांत हे पाय तयार होतात. मृत गर्भाचे पाय तयार झाले होते. त्याचा आकार एका बोटाहूनही कमी दिसून येत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओमध्ये, म्हशीच्या गर्भाशयातील इवलासा भ्रूण दिसून येत आहे. शेतकरी याला हातात उचलतो आणि व्हिडिओमध्ये दाखवू लागतो. एका म्हशीच्या इवलासा भ्रूण आजवर कधीच कोणी पाहिला नसावा ज्यामुळे या व्हिडिओतील दृश्ये पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. एका बोटाच्या आकाराहूनही लहान हा भ्रूण दिसत होता. म्हशीच्या या गर्भपाताचे कारण जरी स्पष्ट झाले नसले तरी याचा व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेकांनी याबबत हळहळ व्यक्त करत हा व्हिडिओ आता मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
म्हशीचा मृत गर्भाशय आणि त्यातील इवल्याश्या भ्रूणाचा हा व्हिडिओ @cow_farm321 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘गायीचा गर्भपात’ असे लिहिण्यात आले आहेत. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “किती महिन्यांचा होता” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “एवढी लहान म्हैस” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “गल्व्ज घाला, नाहीतर यामुळे संसर्ग पसरू शकतो”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.