स्वतः 11 हजार कमवतेय अन् नवरा हवा 2.5 लाख कमावणारा! घटस्फोटित महिलेचा बायोडेटा Viral, युजर्स म्हणाले...
प्रत्येकाला आपल्या आयुष्यात एक जोडीदार हवा असतो. बदलत्या काळानुसार, लग्नाच्या पद्धतीमध्येही अनेक बदल घडून आले. पूर्वी नातेवाईकांच्या साक्षीने घरातील वडीलधारी लोक मुलीला आणि मुलाला लग्नाच्या बंधनात अडकवायचे. त्यावेळी पारंपरिक पद्धतीने लग्न जुळवले जायचे. मात्र आता असे राहिले नाही. हल्लीची पिढी स्वत:चा जोडीदार स्वत: शोधतात. त्यासाठी वेगवेगळ्या विवाह संस्थांमध्ये नावनोंदणी करतात. काही जण यासाठी मॅट्रिमोनियल साइट्सची मदत घेतात.
सध्या अशाच एका मॅट्रिमोनियल साइटवरील एका महिलेचा बायोडेटा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यातील महिलेच्या नवऱ्यासाठीच्या अपेक्षा वाचून आता अनेक युजर्स आवाक् झाले आहेत. तिच्या या आगळ्यावेगळ्या अपेक्षा वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. माहितीनुसार, बायोडेटा व्हायरल होत असलेल्या या महिलेचा घटस्फोट झाला असून, ती नवीन जोडीदाराच्या शोधात आहे.
हेदेखील वाचा – कारला ओव्हरटेक करणे पडले महागात, क्षणार्धात बाइकचे तुकडे अन् तरुण… पाहूनच थरकाप उडेल, Video Viral
महिलेचा बायोडेटा व्हायरल होण्यामागचे कारण म्हणजे, ही महिला स्वतः महिन्याला 11 हजार रुपये घेऊन एनआरआय मुलाची अपेक्षा ठेवत आहे. इतकेच काय तर तिच्या बाकीच्या अपेक्षा ऐकून तुम्ही कपाळालाच हाथ लावून घ्याल. महिलेने आपल्या बायोडेटामध्ये लिहिले आहे की तिला असा नवरा हवा आहे की, जो दरमहा अडीच लाख रुपये कमावणारा असावा आणि जर तो एनआरआय असेल, तर त्याचा पगार 96 हजार डॉलर्स इतका असावा. याशिवाय या घटस्फोटित महिलेला स्वतःसाठी अविवाहितच मुलगा हवा आहे.
महिलेने आपल्या बायोडेटामध्ये अनेक अचंबित आणि धक्का देणाऱ्या गोष्टींचा उल्लेख केला आहे. तिने लिहिले आहे की, ती तिच्या आई-वडिलांना सोडून राहू शकत नाही, त्यामुळे ती ज्या तरुणाशी लग्न करील, तो त्याच्या कुटुंबाबरोबर नाही, तर एकटाच राहणारा असला पाहिजे. इतकेच नाही, तर ती ज्याच्याबरोबर लग्न करेल त्या मुलाकडे 3+ bhk फ्लॅट असायला हवा. तसेच घरात स्वयंपाक आणि साफसफाईला वेळ मिळणार नसल्याने घरात स्वयंपाक आणि इतर कामांसाठी मोलकरीण असलीच पाहिजे. याशिवाय महिलेला खाण्याची आणि प्रवासाची आवड आहे. त्यामुळे होणाऱ्या नवऱ्याने तिला जगभर फिरवून आणावे, अशी तिची इच्छा आहे. अशा अनेक गोष्टी महिलेने आपल्या बायोडेटामध्ये नमूद केल्या आहेत, ज्या वाचून तुम्हाला शॉक बसेल.
हेदेखील वाचा – Ola ई-स्कुटर वारंवार बिघडतेय म्हणत संतापलेल्या ग्राहकाने थेट शोरूमलाच लावली आग, Video Viral
Her qualities and salary 🤡
Expected husbands qualities and salary🗿🗿 pic.twitter.com/NGgJvVvN9l— ShoneeKapoor (@ShoneeKapoor) September 10, 2024
दरम्यान ही व्हायरल पोस्ट @ShoneeKapoor नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. या पोस्टला 1.5 मिलियनहुन अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेक युजर्सने मजेदार कमेंट्समध्ये करत यावर आपले मत मांडले आहे. एका युजरने लिहिले आहे, “ती भविष्यातही एकटीच राहील, असे दिसते.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मुलगा म्हणत असेल, हलवा आहे का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “लोकांमध्ये इतका आत्मविश्वास येतो तरी कुठून?”