आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. वाढत्या विज्ञानाबरोबर अनेक गोष्टी बदलत आहेत. आता सर्वच गोष्टी अगदी लहानातील लहान गोष्टही डिजिटल होऊ लागली आहे. यात गाड्यांचाही सामावेश आहे. सध्या इलेक्ट्रिकल वाहनांनी संपूर्ण व्यापार व्यापून घेतले आहे. मात्र जे तंत्रज्ञान आपल्या कामी येतं, त्याचे जसे फायदे आहेत तसेच काही नुकसानदेखील आहेत. यासंबंधीचाच एक धक्कादायक प्रकार बंगळुरूमध्ये घडला आहे.
तर बंगळुरूमधील एका तरुणाने नवीन इलेक्ट्रिकल घेतली असता ती स्कुटी वारंवार खराब होते या कारणाने त्याने चक्क संपूर्ण शोरूमलाच आग लावली. या सर्व प्रकार आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकजण आता घटनेचा व्हिडिओ पाहून आवाक् होत आहेत. आता संतापलेल्या ग्राहकाची समस्या पाहून आता ओला कंपनी सुद्धा हादरली असेल.
हेदेखील वाचा – आकाशातील शिकाऱ्याचा पाण्याच्या राक्षसाशी सामना, गरुड-मगरीच्या या जीवघेण्या खेळात विजय कुणाचा? पाहा Viral Video
सदर घटना कर्नाटकातील कलबुर्गी या ठिकाणी घडली आहे. तर झाले असे की, मोहम्मद नदीम नावाच्या एका तरुणाने ओला कंपनीची ई-स्कूटर खरेदी केली होती. या स्कूटरची किंमत तब्बल 1.4 लाख रुपये इतकी होती. मात्र या स्कुतीला खरेदी केल्यापासूनच यात काही ना काही तांत्रिक समस्या उद्भवत होत्या. दोन दिवसांत तो ग्राहक स्कूटरला शोरूममध्ये घेऊन आला. पण शोरूममधील कर्मचारी काही ठोस असे उत्तर देत नव्हते. त्यामुळे ग्राहकाला संताप अनावर झाला आणि त्याने थेट संपूर्ण शोरूमला आग लावली.
मीडिया रिपोर्टनुसार या आगीत 6 गाड्या आणि एक कंप्युटर सिस्टम जळून खाक झाल्या आहेत. या प्रकरणी तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर आता कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याच्या बाईकच्या बॅटरीमध्ये आणि साऊंड सिस्टममध्ये काही तरी गडबड होती.
Angry #Ola customer sets #fire to electric scooter showroom in #Kalaburagi in North #Karnataka.
Mohammed Nadeem was frustrated with the new bike as it developed snags frequently. The showroom staff did not respond properly despite multiple appeals, he told cops. pic.twitter.com/EE3ahF1lSc
— TOI Bengaluru (@TOIBengaluru) September 11, 2024
हेदेखील वाचा – इवलासा साप कसा भल्यामोठ्या गायीला गिळतो? एकदा पहाच, Viral Video पाहून व्हाल शॉक
दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @TOI Bengaluru नावाच्या एक्स अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयी माहिती देण्यात आली आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्सने कमेंट्स करत यावर आपले मत मांडले आहे आहे. एका युजरने लिहिले आहे, “पीडित ग्राहकाच्या वागणुकीला मी कोणत्याही प्रकारे माफ करत नाही. त्याच्या कृत्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात.” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, “अजिबात आश्चर्य वाटले नाही, स्कूटरची कॅलिटी खूपच खराब आहे.”