रस्ते अपघाताचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर होत असतात. अनेकदा या रस्त्यावर दुर्घटना घडत असूनही लोक वाहतुकीच्या नियमांचे पालन करत नाहीत आणि मग स्वतःच्या जीवाचं बरंवाईट करून बसतात. यातील काही अपघाताचे व्हिडीओ इतके भयानक असतात की पाहून अंगावर काटा येतो. अनेकदा घाईगडबडीच्या वेळी लोक समोरून येणाऱ्या गाडीला ओव्हरटेक करू पाहतात आणि त्यात स्वतःचाच जीव गमवून बसतात. सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून आता हाच व्हिडिओ मोठ्या वेगाने व्हायरल होत आहे.
अनेकदा लोक स्वत:च्या जीवाची पर्वा न करता धोक्याचे निर्णय घेता आणि नंतर स्वतःचा जीव गमावून बसतात. दर दिवसाला रस्ते अपघातांची नोंद होत असते. घाईच्या नादात लोक अपघाताला बळी पडतात. हा व्हायरल व्हिडीओ एका रस्त्यावरील आहे. व्हिडीओ तु्म्हाला एक ऑटो रिक्षा दिसेल त्या ऑटो रिक्षाच्या मागे एक कार दिसेल. या कारच्या मागून अचानक एक दुचाकी येते आणि कारला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करते. पण ओव्हरटेक करताना समोरून येणारी कार या दुचाकीला धकडते. यानंतर दुचाकीस्वार एकीकडे आणि त्याची दुचाकी दुसरीकडे उडत पडते पण सुदैवाने या चालकाला हेल्मेट घातल्यामुळे त्याला कोणतीही मोठी दुखापत होत नाही. मात्र त्याच्या दुचाकीचे तुकडे होऊन रस्त्याच्या कोपऱ्याला पडले जातात. ही सर्व घटना पाहून तुमच्याही अंगावर काटा आल्याशिववाय राहणार नाही.
हेदेखील वाचा – Ola ई-स्कुटर वारंवार बिघडतेय म्हणत संतापलेल्या ग्राहकाने थेट शोरूमलाच लावली आग, Video Viral
💀💀😳
pic.twitter.com/tNmhbCScp2— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) September 11, 2024
हा व्हायरल व्हिडिओ @Ghar Ke Kalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आता वेगाने व्हायरल होत असून अनेक युजर्सने या व्हिडिओवर कमेंट्स करत घटनेविषयी आपले मत कमेंट्स बॉक्समध्ये व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “असं कोण ओव्हरटेक करतं आणि ते पण इतक्या वेगाने” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “थोडक्यात वाचला.” आणखी एका युजरने लिहिले आहे, “यमराज चांगल्या मुडमध्ये होता त्यामुळे वाचला.”
हेदेखील वाचा – आकाशातील शिकाऱ्याचा पाण्याच्या राक्षसाशी सामना, गरुड-मगरीच्या या जीवघेण्या खेळात विजय कुणाचा? पाहा Viral Video
दरम्यान यापूर्वीसुद्धा रस्ते अपघाताचे अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. अपघातांचे वाढते प्रमाण बघता लोकांनी गाडी चालताना आपल्या जीवाची विशेष काळजी घ्यायला हवी. आपली एक चूक आपल्याला मृत्यूच्या दारी पोहचवू शकते. त्यामुळे अशा घटनांमधून योग्य ती शिकवण घ्या आणि रस्ते चालवताना स्वतःबरोबरच इतरांच्या सेफ्टीची काळजी करा.