food lovers in pakistan people looted the handcart of a child who came to sell bananas video went viral nrvb
नवी दिल्ली : संपूर्ण जग पाहत आहे की, गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानातील लोक (Pakistani Peoples) खाण्यापिण्यावर अवलंबून आहेत (Dependent On Food And Drink). जिथे आम्ही एका व्हिडीओमध्ये पाहिलं होतं की, पाकिस्तानच्या लोकांना भाकरी करायला पीठही मिळत नाही. अशा परिस्थितीत आता आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) समोर आला आहे, जो पाहून तुम्हीही थक्क व्हाल. खरं तर, ट्विटरवर (Twitter) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, हा व्हिडिओ पाकिस्तानचा आहे आणि तेथील एका बाजारात केळी (Banana For Sell) विकण्यासाठी आलेल्या मुलाची हातगाडीच लोकांनी लुटली.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत दिसत आहे की, एक लहान मुलगा आधी हातगाडीवर भरपूर केळी आणतो आणि ते पाहून स्थानिक लोकांनी त्याला घेराव घातला, मात्र लोक केळी विकत घेण्याऐवजी लुटण्याच्या उद्देशाने आले. काही वेळ लोक त्याच्याशी बोलत राहिले, पण काही सेकंदांनंतर एक-दोन लोकांनी त्याच्या हातगाडीतून केळी उचलली आणि मग पळून गेल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
[read_also content=”चाणक्य नीतीनुसार यश मिळवण्यासाठी या 6 गोष्टी नेहमी लक्षात ठेवाव्यात, अन्यथा… https://www.navarashtra.com/lifestyle/according-to-chanakya-niti-useful-tips-jeevan-mantra-for-life-management-nrvb-397393.html”]
इतकंच नाही तर हे पाहून इतर लोकही तेच करू लागले. मुलगा रडत राहिला, भीक मागत राहिला, पण कोणीही त्याचं ऐकायला तयार नव्हतं. मात्र, हातगाडीत ठेवलेली केळी वाचवण्यासाठी मुलाने हातगाडीसह पळ काढला. असे असूनही लोक त्याची गाडी लुटत राहिले. त्यामुळे पाकिस्तान अन्नासाठी कशी तडफडत होत आहे हे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 10 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-10-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
सोशल मीडियावर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांना खूप वाईट वाटत आहे आणि ते सांगत आहेत की, पाकिस्तानमध्ये लोकांमध्ये इतकी उपासमार झाली आहे की विकण्याऐवजी त्यांनी लूट सुरू केली आहे. हा व्हिडिओ ट्विटरवर @crazyclipsonly नावाच्या व्हेरिफाईड अकाऊंटने शेअर केला आहे.
https://twitter.com/crazyclipsonly/status/1655316575501836288
तसेच कॅप्शनमध्ये लिहिले की, “पाकिस्तानमधील जमावाने गाढवाच्या गाडीवर केळी विकणाऱ्या मुलाकडून केळी लुटली.” अशा परिस्थितीत आता हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून एका यूजरने विचारले की, त्याला कोणी मदत केली नाही का? जाणून घ्या हा व्हिडिओ खूप जुना आहे, पण पाकिस्तानची स्थिती आधीच भयानक आणि बिकट झाली आहे.