भाई चारा ऑन टॉप! चितेवरील मृतकाला पाजली दारू अन् सिगारेट, पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही; घटनेचा Video Viral
सोशल मीडियावर दररोज धक्कादायक दृश्ये व्हायरल होतात. यात कधी विचित्र स्टंट्सचे व्हिडिओज व्हायरल होतात तर कधी जीवघेणे अपघातांचे व्हिडिओ. मात्र नुकतेच इथे एक अजब-गजब दृश्य पाहायला मिळाले, जे पाहून लोकांचे डोळे खुलेच्या खुलेच राहीले. हे दृश्ये इतके भयाण आणि विचित्र आहे की मुळातच असे दृश्य कधी तुमच्या नजरेस पडले असावे. यात अंत्यसंस्कार विधींवेळीचे दृश्य दिसले जे लोकांच्या पायाखालची जमीन हादरवत आहेत. आता यात नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊयात.
सध्या सोशल मीडियावर एक अजब-गजब प्रकार व्हायरल झाला आहे. आता कोणत्याही व्यक्तीचे निधन झाले की त्याचे अंत्यसंस्कार विधी पार पडतात हे तर तुम्हाला माहितीच असेल. यावेळी सर्व वातावरण दुःखाचे असते आणि लोक मनावर दगड ठेवून त्या व्यक्तीला शेवटचा निरोप देत असतात. मात्र सध्याच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये एक वेगळेच दृश्य दिसून आले ज्याने सर्वांनाच हादरवून सोडले. यात काही लोक चितेवर पडलेल्या मृतकाला चक्क दारू आणि सिगारेट पाजताना दिसले. या घटनेचा व्हिडिओ तेथील एका व्यक्तीने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला आणि मग हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. हा व्हिडिओ शेअर होताच लोकांनी तो खूप पसंत केला आणि काही काळातच तो व्हायरल झाला.
जंगलाचा नियम कुणाला चुकलाय? राजालाही सोडले नाही, जिवंत शरीर असे फाडले की… थरारक शिकारीचा Video Viral
काय दिसले व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये चितेवर एक मृतदेह पडलेला दिसत आहे. मृतांच्या अंत्यसंस्काराची तयारीही पूर्ण झाली आहे. त्यानंतर मृताचे नातेवाईक त्याच्याकडे येतात आणि त्याचे तोंड उघडून त्याला दारू आणि सिगारेट पाजण्यास सुरुवात करतात. मृत व्यक्तीजवळ उभा असलेला एक माणूस सिगारेट पेटवून तोंडाजवळ घेताना दिसतो. दरम्यान, आणखी एक व्यक्ती मृतदेहाजवळ येतो आणि तोंड उघडून त्यात दारू ओतताना दिसतो. चिता पेटवण्यापूर्वीचे हे सर्व दृश्य पाहून आता लोक थक्क झाले आहेत.
“मला आता यमराज हवा”! आजीच्या उत्तरावर सोशल मीडिया हादरलं, पण प्रश्न काय? मजेदार Video Viral
या घटनेचा व्हायरल व्हिडिओ @meme.university_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ अनेक युजर्सने पाहिला असून अनेकांनी यावर कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “जाता जाता पण सिगारेट शेअरिंगमध्ये प्यावी लागली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “देव असे मित्र सर्वांना देवो”, आणखीन एका युजरने लिहिले आहे, “चखणा पण खाऊ घाला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.