(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. कधी जुगाडचा व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी रीलसाठी विचित्र कृत्य करणाऱ्या लोकांचा व्हिडिओ व्हायरल होतो. कधी लहान मुलांचे गोंडस व्हिडिओ व्हायरल होतात तर कधी डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. याशिवाय कधी-कधी वृद्धांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका आजीचा आहे. व्हिडिओमध्ये तिची नात तिच्यासोबत मिश्किल मजा करताना दिसून येत आहे. यामधील आजीची प्रतिक्रिया आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
आजी-आजोबांचे आपल्या नातलगांशी फार जिव्हाळ्याचे, प्रेमाचे आणि मजेशीर नाते असते. या नात्यात भरभरून साधेपणा असतो. आपल्या मागील पिढीतील हा साधेपणा कुठेतरी हरवून गेला आहे, ज्यामुळे वयोवृद्धांचे हटके व्हिडिओ जेव्हा सोशल मीडियावर शेअर होतात तेव्हा लोक त्यांना फार मजा घेऊन पाहतात. सध्या एका आजीला विचारण्यात आलेल्या प्रश्नावर आजींनी दिलेले हटके उत्तर फार ट्रेंड करत आहे. नक्की व्हिडिओत काय काय घडत ते सविस्तर जाणून घेऊयात.
काय आहे व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये आजी आणि नातीमधील मजेदार संभाषण दिसून येते. यात नातू आजीला म्हणतो, ‘आपण तुझं लग्न करायचं का?’ हे ऐकून आजीला राग येतो आणि ती म्हणते, ‘निर्लज्ज माणसा, निघ इथून पुन्हा असं काही बोलला तर मारून टाकेल. ‘ यानंतर तिची नात विचारते, ‘लग्नासाठी तुला तरुण कँडिडेट हवा की वृद्ध कँडिडेट?’ याच्या उत्तरात आजी म्हणते, ‘मला आता यमराज हवा आहे.’ आजीच्या या उत्तरावर नात हसू लागते आणि व्हिडिओ इथेच थांबतो. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले असते की, ‘आजी आजोबांशी एकनिष्ठ आहे.’ दरम्यान आजींचे हे भन्नाट उत्तर ऐकून अनेकांना हसू अनावर होते आणि लोक हा व्हिडिओ शेअर करू लागतात.
Dadiji toh loyal nikli ❤️😂 pic.twitter.com/MPMyLTsup8
— Harsh (@harshch20442964) January 19, 2025
बापरे! ॲनाकोंडासोबत आंघोळ करू लागली तरुणी, पाहून लोकं हादरली; घटनेचा थरारक Video Viral
आजीचा हा व्हिडिओ @harshch20442964 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हाहा.. आजी किती क्युट आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “इतकं प्रमणाणिक पण कोणी असतं का?”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.