नातवाच्या अंत्यसंस्कारावेळी पार्थिवासमोर जाऊन नाचू लागले आजोबा, पाहून तुम्हालाही बसेल धक्का, Video Viral
सोशल मीडियावर कधी काय शेअर होईल सांगत येत नाही. इथे नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. सोशल मीडियावर कधी तुम्हाला थक्क करणारे, कधी हसवणारे तर कधी आश्चर्याचा धक्का देणारे व्हिडिओज व्हायरल होत असतात. यात बऱ्याचदा काही धक्कादायक व्हिडिओ देखील या असतात, ज्यांना पाहून आपल्या पायाखालची जमीनच हादरते. सध्या अशीच एक हृदय हलवून टाकणारी घटना सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. यात एक आजोबा चक्क आपल्याच नातवाच्या अंत्यसंस्कारावेळी आनंदाने नाचताना दिसून आले.
कोणा व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याला शेवटचा निरोप देण्यासाठी अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावेळी नातेवाईक, कुटुंबीय आणि आपल्या जवळची काही लोक एकत्र येऊन मृत्यू पावलेल्या व्यक्तीला शेवटचा निरोप द्यायला जमा होतात आणि शोक व्यक्त करतात. मात्र सध्या व्हायरल होत असलेल्या अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात काही भलतेच घडल्याचे दिसून आले. असे दृश्य मुळातच कोणत्या अंत्यसंस्कारात तुम्ही पाहिले असावे. याचा व्हिडिओ पाहून तुम्ही अचंबित झाल्याशिवाय राहणार नाही.
हेदेखील वाचा – आज्जी जोमात पाहणारे कोमात! फटाक्यांची पेटती माळ हातात मिरवत आज्जींनी संपूर्ण रस्त्यावर नाचवली, Video Viral
काय आहे व्हिडिओत?
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये अंत्यसंस्काराचा कार्यक्रम सुरु असल्याचे दिसून येत आहे. यावेळी अनेक लोक जमा झाले आहेत आणि त्याच ठिकाणी एक व्यक्ती खुलेआम नाचत आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, नाचणारी व्यक्ती एक आजोबा आहेत, जे अंत्यसंस्कारात नाचून आपल्या नातवाचा निरोप घेत आहे. शेजारी उभे असलेले लोक मात्र त्यांचे हे कृत्य बघून त्यांच्याकडे एकटक पाहत राहतात. एका घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच तो फार कमी वेळेत जास्तीत जास्त लोकांच्या नजरेस पडला आणि व्हायरल झाला. या व्हिडिओने आता सर्वांना थक्क करून टाकले आहे.
हेदेखील वाचा – अति घाई कारचालकाला पडली महागात, ओव्हरटेकच्या नादात गाडी पुलावरून पडली खाली, मृत्यूचा थरारक खेळ Viral
हा व्हायरल व्हिडिओ @nypost नवा च्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘एका इटालियन आजोबांनी आपल्या दिवंगत नातवाचे अंत्यसंस्कार केले’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 63 हजाराहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच काहींनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रया देखील मांडल्या आहेत. एका युजरने लिहिले, “प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारे आपले दुःख व्यक्त करतो” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मला खात्री आहे की या कथेत आणखी काही आहे आणि त्यात काहीतरी मौल्यवान आहे. आजोबांसाठी आनंद आणि ते हसू पहा. त्याचा नातू कुठे चालला आहे हे त्याला माहीत असावे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.