
horrible fish became the cause of death couple ate delicious fish cooked at home died in a moment know the reason nrvb
नवी दिल्ली : माशाचे (Fish) एक नाही तर असंख्य फायदे (Numerous Benefits) आहेत. ते जेवढे स्वादिष्ट असतात, तेवढेच आरोग्यासाठीही फायदेशीर (Beneficial For Health) असतात. इतकेच नाही तर अनेक मोठ्या आजारांच्या उपचारातही माशांचा वापर केला जातो (Fish is also used in the treatment of major diseases). पण तुम्ही कधी ऐकले आहे का की औषधात वापरण्यात येणारे मासे खाल्ल्याने आणि तेही अवघ्या २ तासातच एखाद्याचा मृत्यू झाला आहे?
सोशल मीडियावर सध्या एक विचित्र घटना चर्चेत आहे. ज्यामध्ये विषारी मासे खाणे एका दाम्पत्याला चांगलेच महागात पडले आहे. ही वेदनादायक घटना मलेशियामधून समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येथील एका जोडप्याला मासे खावेसे वाटले, म्हणून त्यांनी बाजारात जाऊन त्यांचा आवडता मासा विकत घेतला.
[read_also content=”घरफोडी आणि रोख रक्कमेचा अपहार करून झाला होता फरार, नोकराला केली अटक; महात्मा फुले चौक पोलिसांची कामगिरी, वाचा कुठे घडलीये घटना https://www.navarashtra.com/crime/absconded-after-burglary-and-embezzlement-of-cash-servant-arrested-mahatma-phule-chowk-police-kalyan-investigate-read-where-the-crime-incident-took-place-nrvb-381082.html”]
यानंतर मासे विकत घेऊन घरी पोहोचल्यावर त्यांनी तो शिजवला आणि दोघांनीही मोठ्या उत्साहाने खाल्ला. पण हा स्वादिष्ट मासा खाल्ल्यानंतर आपले काय होणार आहे याची त्यांना कल्पना नव्हती. मासे खाल्ल्यानंतर दोन तासांत महिलेचा मृत्यू झाला.
होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकले आणि महिलेच्या मृत्यूनंतर तिच्या पतीची प्रकृतीही खूप गंभीर झाली आहे. रुग्णालयात तपासणी केली असता, जे समोर आले ते अतिशय धक्कादायक होते. वास्तविक, दोघांनी शिजवून खाल्लेला मासा अतिशय विषारी आहे.
[read_also content=”केरळ ट्रेन अग्निकांडाचा दहशतवादाशी संबंध? युपीच्या बुलंदशहरमध्ये संशयिताची चौकशी, NIA टीम दाखल https://www.navarashtra.com/crime/kerala-burning-train-update-fire-suspect-detained-from-up-bulandshahr-nia-team-reaches-kannur-nrvb-381046.html”]
मिळालेल्या माहितीनुसार, पफरफिश असे या माशाचे नाव आहे. जो विषारी मासा म्हणून ओळखला जातो. पण तरीही ते चांगले स्वच्छ करून खाल्ले जातात. केवळ काही ट्रेंड शेफला त्याचे विष कसे दूर करावे हे माहित आहे. या जोडप्याने मासे शिजवण्यापूर्वी ते नीट स्वच्छ केले नव्हते. त्यामुळे हा मासा त्यांच्या मृत्यूचे कारण ठरला.