इंडिगो फ्लाईटमधील प्रवाशांचा गोंधळ, क्रू मेंबर्सला काढलं बुकलून, धक्कादायक Video Viral
इंडिगो फ्लाईट आणि भांडणं हा प्रकार आता काय नवीन राहिला नाही. मागील काही काळापासून इंडिगो फ्लाईटमध्ये झालेल्या गोंधळाचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. वेगवगेळ्या कारणावरून झालेल्या फ्लाईटमधील भांडणाचे आणिगोंधळाचे अनेक व्हिडिओज यापूर्वी शेअर करण्यात आले आहेत. त्यातच आता यात आणखीन एका व्हिडिओची भर पडली आहे. सध्या इंडिगो फ्लाईटमधील प्रवासी आणि क्रू मेंबर्समधील बाचाबाची व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
खरंतर झाले असे की, विमान उशिरा टेक ऑफ झाल्याने प्रवासी संतापले आणि इंडिगोच्या कर्मचाऱ्यांवर आपला राग काढू लागले. आश्चर्याची बाब म्हणजे, यावेळी प्रवासी इतके जास्त नाराज झाले की त्यांनी थेट थेट ड्युटी सिक्युरिटी गार्डलादेखील फैलावर घेतले. व्हिडिओमध्ये जर आपण पाहिले तर आपल्याला यात इंडिगोच्या दोन ऐअर होस्टेस दिसत आहेत ज्यांना प्रवाशांच्या प्रश्नांना उत्तर देताना नाकीनऊ होत आहे. नंतर हे प्रवासी सिक्योरिटी गार्डला जोरदार झापताना दिसत आहेत. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला असून अनेकांनी यावर आपल्या विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
हेदेखील वाचा – 83 लाख पगार तरीही भागत नाहीयेत गरजा, कॅनडात राहणाऱ्या भारतीय तरुणाने व्यक्त केली व्यथा, Video Viral
तर मुळात झालं असा की तंत्रीय गडबडीमुळे फ्लाइट अवघे 5 तास उशिरा झाली. यामुळे 5 तास एकाच जागी बसून प्रवासी वैतागले. तसेच इंडिगोने त्यांना उशीर होण्याबाबत प्रवाशांना कोणतीही सूचना दिली नाही. त्यामुळे लोक बराच वेळ संभ्रमात होते. परिणामी हळूहळू लोकांचा संयम सुटू लागला आणि एकदाच या रागाचा संपूर्ण भडका इंडिगोच्या कर्मचाऱ्यावर निघाला. लोकं अक्षरश: पूर्ण शक्तिनिशी त्यांच्यावर शाब्दिक हल्ला करत होते.
Hats off to this Air hostess for showing calmness in face of aggressive behaviour.
— Rishi Bagree (@rishibagree) September 29, 2024
हेदेखील वाचा – Video Viral: “लोक म्हणतात बाईच्या डोक्यावर …” तरुणीची पाटी चर्चेत, कमेंट्समध्ये लोकांच्या हिंसक प्रतिक्रया व्यक्त
हा व्हायरल व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 6 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी यावर कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “याची त्यांना भरपाई मिळायला हवी. 2 तासांपेक्षा जास्त उशीर झाल्यावर तरतूद आहेत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, मला त्या एअर होस्टेसबद्दल वाईट वाटते! त्यांच्या हातात काहीच नाही हे बाकीच्यांनी समजून घेतले पाहिजे!”