सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असत. व्हायरल होण्यासाठी लोक वाटेल ते आणि वाटेल त्या थराला जाऊ पाहतात. जीवघेणे स्टंट आणि मिश्किल कृत्य करून लोक स्वतःला व्हायरल करू पाहतात. यातच आता आणखीन एका नागपूरच्या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. यात ही तरुणी मराठी साजात भररस्त्यात एक पाटी घेऊन उभी आहे. या पाटीवरील वक्तव्य पाहून तुम्ही थक्क व्हाल. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून अनेकांनी यावर आता टीकास्त्र सोडले आहे.
तुम्ही आजवर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक पुणेरी पाट्या पहिल्या असतील किंवा हातात पाटी घेऊ उभे असणारे अनेक तरुण पाहिले असतील जे पाटीवर कधी मजेशीर तर कधी विचार करायला लावणारे संदेश लिहितात. नागपूरमध्ये असाच एक प्रकार घडून आला आहे. जिथे एक तरुणी भररस्त्यात आपल्या हातात एक पाटी घेऊन उभी आहे. या पाटीवर तिने एक संदेश लिहिला आहे, यात नक्की काय लिहिले आहे ते जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – ‘महाभारत’च्या टायटल सॉंगवर केला चिमुकलींनी डान्स, चेहऱ्यावरील हावभाव अन् अद्भुत नृत्य पाहून अंगावर शहारे येतील
हा व्हायरल होत असलेला व्हिडिओ नागपुरातील गणेशोत्सवाचा आहे. यात नऊवारी नेसून मराठी साज करणारी एक तरुणी रस्त्यात आपल्या हातात एक पाटी घेऊन उभी असलेली दिसून येते. ही तरुणी नागपूरच्या कलावंत ढोल ताशा पथकातील आहे.
पाटीवर लिहिले आहे – “लोकं बोलतात
बाईच्या डोक्यावर पदर असावा पण त्या
पेक्षा मला वाटतं आपल्या डोळ्यात आदर
असावा…!
– कलावंत ढोल ताशा पथक, नागपूर
हेदेखील वाचा – 8 रुपयाला शाही पनीर, 5 रुपयाला दाल तडका! हॉटेलचे बिल होत आहे Viral, किमती पाहून चक्रावाल
हा व्हिडिओ @cute_story_30 नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. आता हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी यावर कमेंट्स करून आपले मत यावर व्यक्त केले आहे. यात काही तरुणीच्या मताशी सहमत आहेत तर काही तिच्यावर टीकास्त्र सोडत आहेत. एका युजरने लिहिले, “डोक्यावर पदर घेणे ही राजमाता जिजाऊ यांची ओळख आहे .त्यामुळे डोक्यावर पदर घेवून बघा किती इज्जत मिळते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मॅडम पदर असल्यावर च आपोआप माणसाच्या मनात आदर येतो ही माझ्या महाराष्ट्राची अस्मिता आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खरं आहे ताईसाहेब, जय शिवराय” .