'शॉन द शिप...' कार्टून पोशाखात परेड
सोशल मीडियावर रोज काही ना काही नवीन पाहायला मिळते. कधी असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्य वाटते की खरंच असे घडू शकते का? तर कधी असे व्हिडीओ पाहायला मिळतात जे पाहून आनंद होतो. असे व्हिडीओ परत परत पाहिल्याशिवाय आपण राहत नाही. सध्या एक असाच व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला तुमच्या बालपणीची आठवण येईल. हा व्हिडीओ एक कार्टून परेडचा आहे.
तुम्ही लहानपणी शॉन द शिप कार्टून नक्की पाहिले असेल. हे कार्टून अनेक लहान मुलांच्या पसंतीचे आहे. 1999 पासूनच्या अनेक मुलांसाठी हे आवडीचे कार्टून आहे. एकही डायलॉग नसलेले हे कार्टून इतके बोलके आहे की, पाहाताना मन अगदी आनंदी होऊन जाते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओत या कार्टूनमधील पात्रांच्या पोशाखात काही लोक परेड करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ इंडोनेशियातील असल्याचे सांगण्यात आले आहे.
मेंढीच्या पोशाखात स्वातंत्र्यदिनाची परेड
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, काही लोक कार्टूनच्या पात्राप्रमाणे पोशाख परिधान केला आहे. ज्यामध्ये शॉन शीप मेंढीच्या, नंतर सगळ्या शीपचा मालक, तसेच त्यांच्यावर लक्ष ठेवणाऱ्या कुत्र्याच्या पोशाखात काही लोक परेड काढत आहेत. यामध्ये कार्टूनमधील इतर पात्र देखील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, इंडोनेशियाच्या स्वातंत्र्य साजरा करण्यासाठी ही परेड काढण्यात आली होती. या परेडचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधले आहे. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडीओ
नेटकऱ्यांना आली लहानपणीची आठवण
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर bread_k_meme या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आत्तापर्यंत लाखो लाईक आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. व्हिडीओवर कमेंट करताना युजर्सनी बालपणीची आठवण आल्याचे म्हटले आहे. एका युजरने म्हटले आहे की, बालपणीची आठवण आली, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, माझे आवडते कार्टून, लहानपणी मी हे खूप बघायचे, खूप क्यूट आहे. तर आणखी एकाने म्हटले आहे, लहानपणीचे अनेक कार्टून्सची आठवले, टॉम-जेरी, मिस्टर बीन, निंजा हतोडी. तसेच अनेकांनी यावर हार्ट इमोजी शेअर केल्या आहेत.