Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 14 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिमानास्पद! श्रीकांत शिंदे पुन्हा करणार India चे नेतृत्व; ‘या’ देशात जाणार शिष्टमंडळ

ऑपरेशन सिंदूरअंतर्गत विविध पक्षांचे खासदार एकत्र येत भारताचे एकसंघ प्रतिनिधित्व जगासमोर मांडत होते. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 24, 2026 | 06:14 PM
अभिमानास्पद! श्रीकांत शिंदे पुन्हा करणार India चे नेतृत्व; ‘या’ देशात जाणार शिष्टमंडळ
Follow Us
Follow Us:

इंडोनेशिया येथे जाणाऱ्या शिष्टमंडळाचे करणार नेतृत्व
पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप’मध्ये डॉ. श्रीकांत शिंदे यांची नियुक्ती
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने स्थापन झाली समिती

कल्याण:  ऑपरेशन सिंदूरच्या शिष्टमंडळामधील सक्रिय आणि यशस्वी सहभागानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे पुन्हा एकदा नेतृत्व करण्याची एक महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या पुढाकाराने स्थापन करण्यात आलेल्या ‘पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप’मध्ये डॉ. शिंदे यांचीही निवड करण्यात आली आहे. याअंतर्गत विविध शिष्टमंडळ स्थापन करण्यात आले असून यातील इंडोनेशिया देशाचा दौरा करणाऱ्या शिष्टमंडळाचे नेतृत्व हे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे करणार आहेत.

ऑपरेशन सिंदूरअंतर्गत विविध पक्षांचे खासदार एकत्र येत भारताचे एकसंघ प्रतिनिधित्व जगासमोर मांडत होते. यावेळी खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व केले होते. यावेळी त्यांनी यूएई, सिएरा लिनोन, लायबेरिया, डीआर काँगो या देशांमध्ये भेट दिली होती. आणि ऑपरेशन सिंदुरबाबत भारताची भूमिका या सर्व देशांमध्ये ठामपणे मांडली होती. त्याच धर्तीवर आता पार्लमेंटरी फ्रेंडशिप ग्रुप्सच्या माध्यमातून जागतिक पातळीवर भारताची संसदीय कूटनीती अधिक मजबूत करण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न केला जात आहे. भारताचे विविध देशांशी संसदीय संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत विविध पक्षांतील खासदारांचा समावेश असलेली शिष्टमंडळे ६० हुन अधिक देशांचा दौरा करणार आहे.

Shrikant Shinde : “आधी स्वत:चे घर सांभाळा मग देशाचा विचार करा..”, डॉ. श्रीकांत शिंदे यांची राहुल गांधींवर घणाघाती टीका
या दौऱ्यादरम्यान व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, सांस्कृतिक देवाणघेवाण आणि द्विपक्षीय सहकार्य या विषयांवर सखोल चर्चा केली जाणार आहे. यामध्ये रविशंकर प्रसाद, पी. चिदंबरम, राम गोपाल यादव, टी.आर. बालू, सुप्रिया सुळे, शशी थरूर, अनुराग ठाकूर, असदुद्दीन ओवैसी, अखिलेश यादव, डेरेक ओ’ब्रायन, मनीष तिवारी, अभिषेक बॅनर्जी, कणिमोळी, गौरव गोगोई यांसारख्या दिग्गज नेत्यांपासून ते डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या सारख्या युवा खासदारांपर्यंत व्यापक प्रतिनिधित्व या गटांमध्ये दिसून येत आहे.

यामध्ये इंडोनेशिया, श्रीलंका, जर्मनी, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, दक्षिण आफ्रिका, भूतान, सौदी अरेबिया, इस्रायल, मालदीव, अमेरिका, रशिया, युरोपियन संसद सदस्य देश, दक्षिण कोरिया, नेपाळ, युनायटेड किंगडम, फ्रान्स, जपान, इटली, ऑस्ट्रेलिया, ग्रीस, सिंगापूर, ब्राझील, व्हिएतनाम, मेक्सिको, इराण आणि यूएई अशा विविध महत्त्वाच्या देशांसोबत संवाद साधला जाणार आहे.

युवा आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकत केंद्रीय पातळीवरून त्यांना ही महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे भारताचा आवाज जागतिक पातळीवर अधिक प्रभावीपणे पोहोचणार असल्याचे मानले जात आहे. तसेच खासदार डॉ. शिंदे यांच्या या नव्या आंतरराष्ट्रीय भूमिकेमुळे त्यांच्या राजकीय प्रवासाला नवे बळ मिळणार असून ते जागतिक पातळीवर आपला आणखी एक ठसा उमटवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

Shrikant Shinde : “बाळासाहेबांचा मतदानाचा हक्क रद्द करणाऱ्यांचा उबाठाला विसर”, श्रीकांत शिंदे यांची सडकून टीका
या उपक्रमाविषयी बोलताना लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्पष्ट केले की, या माध्यमातून भारतीय खासदारांना विविध देशांतील संसद सदस्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. उत्कृष्ट संसदीय कार्यपद्धतींची देवाणघेवाण, संसद ते संसद आणि जनता ते जनता या स्तरावर संवाद वाढवणे, तसेच पारंपरिक राजनैतिक प्रयत्नांसोबत संसदीय कूटनीतीला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. एकूणच, या पुढाकारामुळे भारताची जागतिक उपस्थिती अधिक बळकट करण्यास आणि संसदीय कूटनीतीला नवे बळ देण्यास महत्त्वपूर्ण चालना मिळणार आहे.

Web Title: Mp shrikant shinde lead indian team at indonesia parliamentary friendship group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 06:14 PM

Topics:  

  • India news
  • Indonesia
  • Om Birla
  • Shrikant Shinde

संबंधित बातम्या

India China ISR Gap : LAC वर चीनचे 300 उपग्रहांचे जाळे, भारताकडे फक्त 15; कशी तोडली जाईल चिनी ‘किल चेन’?
1

India China ISR Gap : LAC वर चीनचे 300 उपग्रहांचे जाळे, भारताकडे फक्त 15; कशी तोडली जाईल चिनी ‘किल चेन’?

India-AfghanTies: ‘भारत आणि आमचा DNA एकच…’, अफगाण मंत्री ओमारींचे भावूक उद्गार; काबूल दिल्लीच्या ठाम पाठीशी
2

India-AfghanTies: ‘भारत आणि आमचा DNA एकच…’, अफगाण मंत्री ओमारींचे भावूक उद्गार; काबूल दिल्लीच्या ठाम पाठीशी

Iron Dome India: भारताचे संरक्षण कवच आणखी मजबूत; इस्रायलची ‘Rafael’ कंपनी भारतात सुरू करणार ‘आयर्न डोम’ प्रोजेक्ट
3

Iron Dome India: भारताचे संरक्षण कवच आणखी मजबूत; इस्रायलची ‘Rafael’ कंपनी भारतात सुरू करणार ‘आयर्न डोम’ प्रोजेक्ट

UNSC Election 2026 : जर्मनीचा पराभव भारतासाठी धोक्याची घंटा पण ग्लोबल साउथचा मात्र पाठिंबा; G4गट बनतोय का मार्गातील अडथळा?
4

UNSC Election 2026 : जर्मनीचा पराभव भारतासाठी धोक्याची घंटा पण ग्लोबल साउथचा मात्र पाठिंबा; G4गट बनतोय का मार्गातील अडथळा?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.