Nepal Flood: निरागस डोळे, पाठीवर चिमुकली बहिण,(फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
आतापर्यंत ६०० हून जास्त लोकांचा जीव गेल्याची बातमी आहे. तर २००० पेक्षा जास्त लोक कुठे आहेत हेच कळत समजत नसून त्यामधील 30 लोक हे पर्यटक असल्याची माहिती मिळते. भारताचे पण बरेच लोक बेपत्ता आहेत, त्यातली ३ लोकांची प्रेतं तर भारतात वाहून आल्याचं सांगितलं जातंय.
सोशल मीडियावर नेपाळचे असे व्हिडीओ येत आहेत की बघून अंगावर काटा येईल. सगळीकडे फक्त चिखल आणि पाणी. लोक चिखलातून एकमेकांना बाहेर काढत आहेत.या कठीण काळात भारताने लगेच मदतीचा हात पुढे केला आहे. भारतीय लष्कराची विमानं जेवण, औषधं आणि इतर मदत घेऊन नेपाळला पोहोचली आहेत. भारतासोबतच अजून काही देशांनी पण मदत पाठवली आहे.यातच दोन व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहेत. Nepal Flood:
व्हिडिओमध्ये लहान मुलगा आपल्या दीड-दोन वर्षांच्या बहीणीला पाठीवर घेऊन फिरत आहे. महापुरामध्ये आपल्या आई-वडीलांना शोधत असून चिमुकली रडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये मुलाने निळ्या रंगाचे टी-शर्ट घातले आहे. तसेच चिमुकलीच्या अंगावर निळ्या रंगाचे सोनेरी बुट्टे असलेले कपडे परिधान केले आहे.
नेपाल बाढ़ का दर्दनाक मंजर! बहन को गोद में लिए माता-पिता को ढूंढता रहा मासूम#NepalFlood | #nepalfloodvideo | #EmotionalVideo | #NepalNews | #nepal pic.twitter.com/r4YeUUkaxK — IBC24 UP/UK (@ibc24upuk) August 31, 2026
मिळालेल्या बातम्यांनुसार ६०० पेक्षा जास्त लोकांनी आपला जीव गमावलाय. तर दोन हजारांहून अधिक जण अजूनही सापडले नाहीयेत. या बेपत्ता लोकांमध्ये ३२० भारतीय सुद्धा आहेत असं सांगितलं जातंय. म्हणजे परिस्थिती किती गंभीर आहे याचा तुम्ही विचार करा.पण या सगळ्या वाईट बातम्यांमध्ये एक गोष्ट मात्र सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. आणि ती म्हणजे एक छोटंसं हिरव्या रंगाचं घर. जिकडे बघावं तिकडे सगळं काही पाण्याखाली गेलं असताना, आजूबाजूच्या इमारती डोळ्यादेखत पडत असताना, हे दोन मजली हिरवं घर मात्र अगदी ठामपणे उभं आहे.






