Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: पैशाचा तोरा दाखवला अन् 1 कोटी गमावले, रील बनवणं पडलं महागात, तामिळनाडूच्या इन्फ्लुएन्सरसोबत नेमकं काय घडलं?

Viral Video: तमिळनाडूतील कन्याकुमारी येथील महिला इन्फ्लुएन्सर मधुमिता सोशल मीडियावर सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि घरातील ऐश्वर्य दाखवणारे व्हिडीओ व रील्स पोस्ट करत होती. एका व्हिडीओमध्ये तिने मुलीवर 500 रुपयांच्या नोटांचा वर्षाव करतानाही दाखवले होते.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 28, 2026 | 02:19 PM
Viral Video: पैशाचा तोरा दाखवला अन् 1 कोटी गमावले (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Viral Video: पैशाचा तोरा दाखवला अन् 1 कोटी गमावले (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:

आजकाल सर्वजण आपले स्टेटस् दाखवण्यासाठी महागड्या गाड्या, सोन्याचे दागिने पैशाचा बंडल हे रीलवर दाखवतात. आपल्याकडे सगळ्यात जास्त पैसा-पाणी असून आपण कसे हाय-प्रोफाईल आहे हे दाखवतात तसेच अशा व्हिडिओंना लाखो व्ह्यूज मिळतात. मात्र हाच पैशाच माज कधीना-कधी चांगलाच अंगलटय येतो. असाच प्रकार तमिळनाडूच्या एका महिला इन्फ्लुएन्सर सोबत घडला आहे. लेकीच्या अंगावर पैशांचा पाऊस पडताना दाखवला आणि काही तासांतच तिच्या घरात तब्बल एक कोटींची चोरी झाली. Viral Video:

नेमकं काय झालं?

ही घटना कन्याकुमारीची आहे. मधूमिता एक महिला इन्फ्लुएन्सर ती नेहमी तिचे दागिने, पैसे, घर दाखवत रील बनवते. काही दिवसांपूर्वी तिने एक व्हिडीओ टाकला त्या व्हिडिओमध्ये 500 रुपयांच्या नोटांची बंडलं दाखवत अंगावर ढिगभर दागिने घातले होते. एवढंच नाही तर ती आपल्या लेकीवर नोटांचा पाऊस पाडत पैसा उधळताना दिसली. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत लाखो लोकांनी पाहिला. हा व्हिडीओ चोरांनी सुद्धा बघितला आणि तिथूनच सगळा प्लॅन सुरू झाला.

Parvesh Verma Viral Video: रस्त्याच्या कामावर सवाल करताच तरुणाच्या कानशिलात? प्रवेश वर्मांचा VIDEO व्हायरल

बाजारात गेली आणि मागे चोरी झाली

मधुमिता आपल्या नवऱ्यासोबत बाजारात खरेदीला गेली असता, चोरांनी त्याचा फायदा घेत घरात घुसले. त्यांनी घरातले सोन्याचे दागिने, हिऱ्याचे हार आणि 50 हजार रुपये कॅश घेऊन पळ काढला. हा सगळा ऐवज जवळपास तब्बल 1 कोटी रुपयांचा असल्याची माहिती मिळत आहे. घरी आल्यावर मधुमिताला धक्काच बसला. तिने तात्काळ पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. चोरांना पकडायला 5 वेगवेगळ्या टीम बनवल्या असून पण प्रश्न असा आहे की घरात CCTV होते, तरी चोर घरात कसे आले? त्यांना घराची सगळी माहिती कशी कळाली?

🚨Kanyakumari Influencer Madhumita, who used to flaunt her gold jewellery and cash online, gets robberd by thieves; all jewellery stolen pic.twitter.com/prCNw9kIPk — The Tatva (@thetatvaindia) September 26, 2026

जुन्या व्हिडीओंमधून माहिती मिळवली का?

पोलिसांना संशय आहे की चोरांनी मधुमिताच्या जुन्या व्हिडीओंचा वापर केला असावा. कारण तिने आधीच्या अनेक रीलमध्ये घराचा आतला भाग दाखवला होता. कुठे काय ठेवलंय, लॉकर कुठे आहे, दागिने कुठे ठेवते, सगळं व्हिडीओमध्ये दिसत होतं. तिने एका व्हिडीओमध्ये तर दागिन्यांची काळजी कशी घेते हे पण सांगितलं होतं. त्यामुळे चोरांनी सगळा अभ्यास करूनच चोरी केली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. अजून तपास चालू आहे.या घटनेनंतर घाबरून मधुमिताने आपले सगळे सोशल मीडिया अकाउंट बंद केले आहेत, डिलीट केले आहेत.

She flaunted gold jewellery and stacks of cash online – until the internet’s audience apparently became a little too interested. 😭💰 Kanyakumari influencer Madhumita has reportedly been robbed, with thieves allegedly stealing all her jewellery. What was once her social-media… pic.twitter.com/np5b7Tt9NE — Gajabkiduniyaa (@Gajabkiduniyaa) September 26, 2026

iPhone Viral Video: बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांना चक्क १.६४ लाखांचं iPhone 18 गिफ्ट; व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क

यातून काय शिकायचं?

प्रसिद्धीसाठी पैसा दाखवणं किती धोक्याचं असू शकतं हे या घटनेने दाखवून दिलं आहे. सोशल मीडियावर तुम्ही काय टाकता ते सगळं जग बघत असतं. चांगले लोक पण बघतात आणि वाईट नजर असलेले चोर पण बघतात.तुम्ही घरातले दागिने, पैसे, घराची माहिती सगळी जगाला दाखवली तर चोरीचा धोका वाढतोच.त्यामुळे सोशल मीडियावर श्रीमंतीचा दिखावा करणं बंद केलं पाहिजे. तुमच्याकडे किती पैसा आहे हे जगाला सांगण्याची गरज नाही. आहे ती श्रीमंती शांतपणे जपा.तुम्हाला काय वाटतं? इंस्टावर पैसे दाखवणं योग्य आहे का? कमेंट करून नक्की सांगा.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Kanyakumari influencer madhumita one crore theft instagram reels

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 28, 2026 | 02:19 PM

Topics:  

  • viral news
  • Viral News update

संबंधित बातम्या

iPhone Viral Video: बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांना चक्क १.६४ लाखांचं iPhone 18 गिफ्ट; व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क
1

iPhone Viral Video: बॉस असावा तर असा! कर्मचाऱ्यांना चक्क १.६४ लाखांचं iPhone 18 गिफ्ट; व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क

पांचट जोक्स : बंड्याचं प्रपोजल पण मुलीचं उत्तर ऐकताच बंड्याने का हाणली कानशिलात… वाचाल तर पोट धरुन हसाल
2

पांचट जोक्स : बंड्याचं प्रपोजल पण मुलीचं उत्तर ऐकताच बंड्याने का हाणली कानशिलात… वाचाल तर पोट धरुन हसाल

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral
3

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral
4

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.