Viral Photo: सॅलडच्या पिशवीतून बाहेर पडला भयावह जीव, फोटो पाहून अचंबित व्हाल
अलीकडेच ऑनलाईन ऑर्डर केलेल्या अनेक पदार्थांमध्ये कोणता ना कोणता जीव आढळल्याच्या घटना घडत आहेत.prabhu ra अशीच एक घटना सोशल मीडियावर आता व्हायरल झाली आहे. यात विकत घेतलेल्या सॅलडच्या पिशवीमध्ये चक्क एक जिवंत जीव आढळून आला आहे. याचा फोटो सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून आता अनेकजण हा फोटो पाहून थक्क झाले आहेत. हा फोटो पाहून तुमचाही थरकाप उडेल.
विचार करा तुम्हाला फार भूक लागली आहे आणि खाण्यासाठी दुकानातून काही खरेदी करून आणले. आता आपली भूक भागवण्यासाठी तुम्ही हे विकतचे पॅकेट उघडता आणि त्यातून एक जिवंत जीव बाहेर पडतो. अचानक बाहेर पडलेला हा जिवंत जीव पाहून अनेकांचा थरकाप उडेल. ही घटना खऱ्या आयुष्यात एका व्यक्तीसोबत घडली आहे. इंग्लंडमधील एका व्यक्तीने नुकतीच सुपरमार्केटमधून खरेदी केलेली सॅलेडची पिशवी उघडली आणि त्यात सॅलडसह बेडूकपण बाहेर निघाला. या घटनेचा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
हेदेखील वाचा – आई ही आईच असते! बाळाला वाचवण्यासाठी वाघाशी भिडले अस्वल, वाघाशी कशी पाळताभुई एक झाली ते पहाच
सॅलडच्या पिशवीत जिवंत बेडूक सापडल्यानंतर या व्यक्तीने त्वरित ब्रॅकनेल येथील वेट्रोज वितरण केंद्रातील कर्मचाऱ्यांनी परिसरातील प्राणी बचाव पथकाशी संपर्क साधला. यानंतर बर्कशायर रेप्टाइल रेस्क्यूने या घटनेवर भाष्य केले आणि सांगितले, एका ग्राहकाला सॅलेडच्या पिशवीत बेडूक सापडला आणि त्यांनी त्या सॅलेडची जिथून खरेदी केली होती तिथे तो परत केला. मात्र हा बेडूक यात नक्की यात कसा आला याबाबत कोणालाही काही समजले नाही.
Toad found in supermarket bag of salad: https://t.co/oCRD3Y5Bx2#weird pic.twitter.com/0EsoNHO7Y7
— talker (@talker_news) September 25, 2024
हेदेखील वाचा – हेच ते प्रेम का? भररस्त्यात प्रियकराने केली प्रेयसीला मारहाण, Video Viral
याचा व्हायरल फोटो @talker नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या फोटोला,सॅलेडच्या सुपरमार्केट बॅगमध्ये बेडूक सापडला असे कॅप्शन देण्यात आले आहे. दरम्यान, अलीकडच्या काळात अशा प्रकारच्या घटना आश्चर्यकारकपणे सामान्य झाल्या आहेत. जिथे लोकांना एखाद्या पार्सलमध्ये, फळांच्या पिशवीत किंवा भाज्यांमध्ये असे जीवघेणे प्राणी आढळतात.