प्रेम ही जगातील सर्वात सुंदर गोष्ट आहे. आई मुलामध्ये असलेले प्रेम असो किंवा बहीण भावातील प्रेम असो, नवरा बायकोमधील प्रेम असो किंवा प्रियकर प्रेयसीमधील प्रेम नाती वेगळी असली तरी प्रेम मात्र एकच. इतिहासातही आपल्याला प्रेमाच्या अनेक प्रेरणादायी कथा पाहायला मिळतात. जिथे प्रेम आहे तिथे त्याग, विश्वास, काळजी अशा अनेक गोष्टी येतात. मात्र सध्याच्या युगात प्रेमाची व्यख्या बदलली आहे. आताच्या तरुणांना प्रेमाचा खरा अर्थच समजलेला नाही. अनेकदा प्रेयसी-प्रियकर हिंसक होऊन आपल्या पार्टनर बरोबर नको ते करून बसतात याच्या अनेक बातम्या तुम्ही आजवर पहिल्या असतील.
सध्या अशाच एका प्रियकर आणि प्रेयसीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण भररस्त्यात त्याच्या प्रेयसीला मारहाण करताना दिसून येत आहे. त्याचे हे कृत्य जवळील एकाने आपल्या कॅमेरात कैद केले असून याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताच आता हा चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून आता तुम्हीच ठरवा नक्की यात चूक कोणाची?
हेदेखील वाचा – 15 रुपये हॉस्टेलची फी, 4 रुपये विजेचे बिल अन् फस्ट क्लास सर्व्हिस, AIIMS मधील विद्यार्थ्यांची खोली पाहून अचंबित व्हाल
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक तरुण आणि तरुण रस्त्याच्या कडेला गाडीच्या मागे उभे असताना दिसून येतील. त्यांना पाहूनच त्यांच्यात काहीतरी बिनसल्याचे दिसून येत आहे. बहुतेक दोघेही कोणत्या तरी कारणास्तव भांडत असावेत. तरुण त्या तरुणीला जाब विचारताना दिसत आहे आणि पुढील क्षणातच हा तरुण तरुणीच्या कानशिलात लागावतो. यानंतर तो एवढ्यावरच थांबत नाही तर दोन ते तीन वेळा तो एका मागून एक थोबाडीत मारण्यास सुरुवात करतो. रुणी मात्र त्याचा हात पकडून रडताना दिसते. हा व्हिडिओ पाहून आता अनेकांना संताप अनावर झाला आहे. या व्हिडिओमध्ये, हेच ते प्रेम आहे का… असे लिहिण्यात आले आहे.
हेदेखील वाचा – वय गेलं पण उत्साह अजून तसाच! आजोबांची दमदार बॅटिंग पाहून धोनीचा हेलिकॉप्टर शॉटही वाटेल फिका, पाहा Viral Video
हा व्हायरल व्हिडिओ @kimi_4251 नावाच्या इंस्टग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये, “जेव्हा आपण कोणावर प्रेम करतो तर आपल्याबरोबर असेच होते. पण खरं प्रेम करणे चुकीचे आहे का?” असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओ व्हायरल होताच अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया मांडल्या. एका युजरने लिहिले आहे, “मुलीचा आदर करा मुलांनो, यासाठी नाही की ती मुलगी आहे, पण यासाठी करा की तुमच्या आईने तुमच्यावर चांगले संस्कार केले आहेत.”तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे,“एकटी राहा पण कुणाचा मार सहन करू नका”.