अरे जीव इतका स्वस्त आहे का? महाकुंभात तरुणाची रिस्क पाहून सर्वच ओरडू लागले पण शेवटी जे झालं... धडकी भरवणारा Video Viral
उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे , ज्याची सांगता येत्या काही दिवसांतच होणार आहे. ज्यामुळे जगभरातील करोडो भाविक आता प्रयागराजच्या वाटेने निघाले आहेत. दररोज सोशल मीडियावर महाकुंभमधील अनेक व्हिडिओज व्हायरल होत आहेत. कधी येथील सुंदरी चर्चेचा विषय बनतो कधी साध्वी तर कधी इथली चेंगराचेंगरी. यादरम्यानच आता इथला आणखीन एक धक्कादायक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर झाला आहे.
यात तरुण आपल्या जीवाची पर्वा न करता एक धोकादायक स्टंट करताना दिसून आला आहे. त्याचे हे कृत्य पाहून फक्त सोशल मीडिया युजर्सच नाही तर महाकुंभातील लोकही थक्क झाले. लोक अक्षरशः त्याच्या जीवासाठी ओरडू लागले मात्र तरुणाने काही त्यांचे ऐकले नाही. घटनेत नक्की काय आणि कसं घडलं याविषयी चला सविस्तर जाणून घेऊयात.
काय दिसले व्हायरल व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओत जर तुम्ही पाहिले तर यात दिसते की, महाकुंभ मेळ्यात एका ब्रीजवर प्रचंड गर्दी जमली आहे. या गर्दीतच तरुण आपला जीव धोक्यात घालत असल्याचे समजते. गर्दीपासून वाचण्यासाठी आणि लवकर पुढे जाण्यासाठी एक तरुण आपल्या जीवाशी मोठी रिस्क घेऊ पाहतो जे पाहून सर्वच थक्क होतात. घडते असे की तो ब्रीजवरील सुरक्षाभींतीच्या वर चढून त्यावर चालत गर्दीतून बाहेर निघण्याच्या प्रयत्न करतो. इतक्या पातळ आणि लहानशा भागातून तो आपला जीव धोक्यात घालत चालताना दिसतो. त्याला असे करताना पाहून खाली उभे असलेले लोक त्याला मोठ्यामोठ्याने ओरडत असे न कारण्याचा सल्ला देतात मात्र तरुण काही त्यांचे ऐकत नाही आणि आपल्या प्रयत्न जारी ठेवतो. मात्र थोड्याच वेळात त्याला आपण खूप मोठी चूक केली आहे, याची जाणीव होते आणि तो पुन्हा सुरक्षाभींत ओलांडून ब्रीजवर जातो.
आग्र्यात श्वानासोबत क्रूरता! पाय पकडत गरागरा फिरवले अन् थेट जमिनीवरच आपटले, संतापजनक Video Viral
हा संपूर्ण प्रकार आता तेथील एका व्यक्तीने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केला असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर नंतर शेअर करण्यात आला. व्हिडिओ व्हायरल होताच लोकांनी यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. एका युजरने लिहिले की, “भाऊ लवकरच वैकुंठाला जाण्याचा प्लॅन करत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मग बोलणार की प्रशासन काही करत नाही”. याचा व्हिडिओ @iam_star_amit_kumar नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.