(फोटो सौजन्य: Twitter)
भारतीय विवाहसोहळ्याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलेले पाहायला मिळतात. यात बऱ्याचदा लग्नसमारंभातील काही मनोरंजक आणि हास्यास्पद क्षण शेअर केले जातात. असे व्हिडिओज सोशल मीडियावर फार वेगाने व्हायरल होतात आणि लोक याची फार मजा देखील घेतात. मात्र सध्या इथे जि घटना व्हायरल होत आहे ती इतकी विचित्र आहे की ती वाचून यावर नक्की हसावं की रडावं हेही तुम्हाला समजणार नाही. सध्या आपल्याच लग्नात डान्स करणं दिल्लीतील एका वराला महागात पडलं.
खरं तर असं झालं होतं की, वराला त्याच्या मित्रांनी वारंवार विचारल्यानंतर ‘चोली के पीछे’ या गाण्यावर तो आनंदात नाचू लागला? हे पाहून वधूच्या वडिलांना अचानक राग येतो आणि भरमंडपात ते लग्न मोडून टाकतात. ही घटना आता सोशल मीडियावर नवीन चर्चेचा वीषय बनली आहे. @xavierunclelite नावाच्या एक्स अकाऊंटवर इंग्रजी वर्तमानपत्राचे कटिंग शेअर केले गेले. यामध्ये अशी बातमी आहे, ज्यावर लाल शाईने वर्तुळ काढले आहे. या बातमीचे हेडलाईन आहे – नातेवाईकांचे मनोरंजन करण्यासाठी वराने चोली के पीछे गाण्यावर डान्स केला, त्यानंतर मुलीच्या वडिलांनी लग्नच मोडून टाकले.
आग्र्यात श्वानासोबत क्रूरता! पाय पकडत गरागरा फिरवले अन् थेट जमिनीवरच आपटले, संतापजनक Video Viral
व्हायरल पोस्टनुसार, 16 जानेवारी रोजी, जेव्हा वराने नवी दिल्लीत आपल्या लग्नाच्या मिरवणुकीसह लग्नाच्या ठिकाणी पोहोचले आणि ‘चोली के पीछे क्या है’ या प्रसिद्ध गाण्यावर नाचण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याच्या सासरच्यांनी लग्न मोडले. लग्नाला उपस्थित असलेल्या पाहुण्यांच्या म्हणण्यानुसार, वराचे मित्र त्याला सतत नाचण्यासाठी भडकावत होते. हे गाणे वाजताच वराला स्वतःला रोखता आले नाही आणि तो आनंदात नाचू लागला. काही पाहुणे वराचा जयजयकार करत असतानाच वधूचे वडील अचानक तेथे आले आणि आपल्या भावी जावयाचे हे वागणे पाहून संतापाने लग्न मोडले. त्यांनी हा आपल्या कौटुंबिक मूल्यांचा अपमान असल्याचे म्हटले आहे.
probably the funniest ad placement i’ve seen till date 😂 pic.twitter.com/a189IFuRPP
— Xavier Uncle (@xavierunclelite) January 30, 2025
या निर्णयामुळे वधू स्पष्टपणे नाराज झाली होती आणि रडताना दिसली होती, तर वर तिच्या वडिलांना पटवून देण्याचा प्रयत्न करत होता की हे सर्व केवळ मौजमजेसाठी केलेले नृत्य आहे. तथापि, वधूच्या कुटुंबीयांच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न रद्द झाल्यानंतर तिचे वडील अजूनही संतापले होते आणि त्यांनी आपल्या मुलीला वराच्या कुटुंबाशी काहीही संबंध ठेवू नका असे सक्त आदेश दिले होते. आनंदाचे आणि उत्सवाचे वातावरण आणणारे लग्न दोन्ही कुटुंबांसाठी काहीकाळातच शोकांतिकेत बदलले.
या व्हायरल ;पोस्टवर सध्या युजर्स मात्र मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत या घटनेवर आपले मत व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे, “सासरच्यांनी योग्य निर्णय घेतला नाहीतर असा डान्स त्यांना रोज पहावा लागला असता” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यापेक्षा तर त्याने पळून जाऊन लग्न करायला हवे होते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.