बापरे! तरुणाने महाकाय कोब्राचे घेतले चुंबन तेवढ्यात सापाने काढला फणा अन् क्षणार्धात... थरकाप उडवणारा Video Viral
किंग कोब्रा हा धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे. तो आपल्या विषारी दंशासाठी ओळखला जातो. याचा एक दंश व्यक्तीला थेट मृत्यूच्या दारी पोहचवू शकतो. किंग कोब्राचा धाक सर्वत्र इतका आहे की त्याला पाहून प्राणीच काय तर माणसंही दुरूनच उलटे पाय करून पळू लागतात. आता सध्या सोशल मीडियावर किंग कोब्राचा एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येत आहे. यात एक व्यक्ती चक्क महाकाय कोब्राच्या जवळ जाऊन त्याचे चुंबन घेताना दिसून येत आहे. व्हिडिओतील ही दृश्ये पाहून आता अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात तर कधी आपल्याला भावुक करून जातात. यात बऱ्याचदा काही अशा व्हिडिओजचा देखील समावेश असतो ज्यांना पाहून आपल्याला आश्चर्याचा धक्का बसतो. यात बऱ्याचदा काही प्राण्यांचे व्हिडिओ देखील सामील असतात. सध्या किंग कोब्राचे एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसून आला आहे मात्र यात कोब्राची कोणाशी फाइट होत नसून एक व्यक्ती त्याचे चुंबन घेताना दिसून आला आहे. ज्या महाकाय कोब्राला पाहून आपण दुरूनच पळून जाऊ त्याला हा व्यक्ती चुंबन घेण्याचे धाडस दाखवत आहे. मात्र यानंतर कोब्रा आपला फणा काढतो आणि व्हिडिओत पुढे काय होते ते जाणून घेऊयात.
हेदेखील वाचा – पोलिसांचाही धाक राहिला नाही! भांडण सोडवायला आलेल्या पोलिसाला लोकांनी जोरदार हाणले, धक्कादायक Video Viral
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओत व्यक्ती या महाकाय कोब्राला मागून हळूच पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. मात्र कोब्राला ते समजताच तो आपला फणा काढून त्यावर हल्ला करतो. हा व्यक्ती प्राणीप्रेमी आहे, तो आतापर्यंत अनेक धोकादायक प्राण्यांशी भेटला आहे. ज्यामुळे तो या कोब्रावर नियंत्रण मिळवण्यास यशस्वी होतो. व्हिडिओत अनेकदा कोब्रा त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करताना दिसून येतो मात्र व्यक्ती काही ना काही करून त्याला शांत करतो. अखेर अशी एक वेळ येते जेव्हा हा व्यक्ती कोब्राच्या मस्तकावर चुंबन देखील घेतो. हे थरारक दृश्य पाहून अनेकांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसत नाहीये मात्र हे खरे आहे. शेवटी व्यक्ती कोब्राला पकडून आपल्या गळ्यात अडकवतो आणि आपल्या सामर्थ्याचे दर्शन युजर्सना घडवतो.
हेदेखील वाचा – दुसऱ्याची स्कुटर चोरी करायला आले होते, स्वतःची बाइक सोडून पळावे लागले, हास्याने लोटपोट करणारा Video Viral
हा धक्कादायक व्हिडिओ @therealtarzann नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 5 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी कमेंट्स करत व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया देखील दिल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे सामान्य नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “रियल टार्झन”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.