सोशल मीडियावर दररोज नवनवाईन व्हिडीओज व्हायरल होत असतात. मात्र यात कधी कधी असे काही व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यांना पाहून लोक हैराण होतात. सध्या यूपीच्या सहारनपूरमधील एक धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दोन्ही पक्षांमधील भांडण थांबवण्यासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला एका व्यक्तीने थप्पड मारल्याने लोकांमध्ये पोलिसांची भीती कशी संपली आहे, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चांगलाच धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओतील राडा पाहून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही.
काय आहे व्हायरल व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की , काही लोक रस्त्यावर उभे आहेत आणि तेथे पोलिस देखील उपस्थित आहेत. एक पोलीस व्हिडीओ बनवताना दिसत आहे. काही लोक पोलिसाशी वाद घालत असल्याचे या व्हिडिओत दिसून येत आहे. यानंतर अचानक काही वेळाने लाल टी-शर्ट घातलेला एक व्यक्ती पोलिसाला थप्पड मारायला लागतो. त्याच्या बचावात पोलीस त्या व्यक्तीला थप्पडही मारतात, पण त्यानंतर आणखी लोक पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करू लागतात.
हेदेखील वाचा – दुसऱ्याची स्कुटर चोरी करायला आले होते, स्वतःची बाइक सोडून पळावे लागले, हास्याने लोटपोट करणारा Video Viral
सहारनपूरमधील जनकपुरी पोलीस स्टेशन हद्दीतील शांती नगर कॉलनीत शुक्रवारी रात्री उशिरा दोन पक्षांमध्ये पैशावरून भांडण झाले. दोन्ही बाजूचे लोक रस्त्यावर उतरले. गोंधळाची माहिती मिळताच बिबट्या आणि पीआरव्ही पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला मात्र एका बाजूची समजूत काढणे पोलिसांना अवघड गेले. एका व्यक्तीने पोलिस कर्मचाऱ्यालाच थप्पड मारली. ही घटना घडली तेव्हा एक पोलीस कर्मचारी आपल्या मोबाईलमधून व्हिडिओ बनवत होता जो सोशल मीडियावर व्हायरलही होत आहे. यानंतर घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा मागवण्यात आला आणि त्यानंतरच प्रकरण आटोक्यात आले.
पहले बरेली और अब #सहारनपुर में भीड़ ने पुलिस की पिटाई कर दी…
कोई बात नहीं..
यही तो है #अमृतकाल 🍊#UttarPradesh pic.twitter.com/tnKYECdT5M— Ruby Arun रूबी अरुण 🇮🇳 (@arunruby08) November 2, 2024
हेदेखील वाचा – विशालकाय अजगराला ओढत काढले बाहेर, क्षणार्धात अजगराने घातला गळ्याभोवती विळखा अन् थरारक घटनेचा Video Viral
या प्रकरणी एसपी सिटी अभिमन्यू मांगलिक यांनी सांगितले की, कॉन्स्टेबलच्या तक्रारीवरून जनकपुरी पोलिस ठाण्यात 8 नामांकित लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी 3 जणांना अटकही केली आहे. सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तीन आरोपी कान पकडून माफी मागताना दिसून आले आहेत. दरम्यान सदर व्हायरल व्हिडिओ हा @arunruby0 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.