Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाबो ! ३ मिनिटांमध्ये त्याने खाल्ले ८८ जाफा केक, खाण्याच्या नव्या विश्वविक्रमाची नोंद

मॅक्स स्टॅनफोर्ड (Max Stanford) नावाच्या माणसाने आपल्या खाण्याच्या छंदातून विश्वविक्रम (World Record) केला आहे. डेझर्ट म्हणून कमी अधिक प्रमाणात खाल्ल्या जाणाऱ्या जाफा केकचे (Jaffa Cake) ८८ तुकडे अवघ्या तीन मिनिटांत खाण्याचं वर्ल्ड रेकॉर्ड (World Record Of Eating 88 Jaffa Cakes) त्यानी केलं आहेत.

  • By साधना
Updated On: Mar 04, 2022 | 06:08 PM
max stanford eating 88 cakes

max stanford eating 88 cakes

Follow Us
Close
Follow Us:

लंडन : काही लोकांना खाण्या-पिण्याची खूप आवड असते. तुम्ही त्यांना कितीही पदार्थ खायला द्या, ते खाऊन पचवायचे कसे हेही त्यांना माहिती असतं. काही लोक मोठ्या डिशेस कमी वेळेत संपवण्याचं चॅलेंज (Food Challenge) स्वीकारताना आणि ते जिंकताना आपण पाहतो. सोशल मीडियावरही अशा प्रकारचे व्हिडिओ नेहमीच व्हायरल होतात.

मॅक्स स्टॅनफोर्ड (Max Stanford) नावाच्या माणसाने आपल्या खाण्याच्या छंदातून विश्वविक्रम (World Record) केला आहे. डेझर्ट म्हणून कमी अधिक प्रमाणात खाल्ल्या जाणाऱ्या जाफा केकचे (Jaffa Cake) ८८ तुकडे अवघ्या तीन मिनिटांत खाण्याचं वर्ल्ड रेकॉर्ड (Eating World Record Video) त्यांनी केलं आहे. हा विक्रम करण्यासाठी ३४ वर्षांच्या मॅक्स स्टॅनफोर्डने सरासरी दोन सेकंदात एक जाफा केक खाल्ला आणि तो घशातून खाली जावा यासाठी गरम पाणी पित राहिला. अशा प्रकारे त्यांनी अत्यंत वेगात म्हणजेच केवळ तीन मिनिटांत ८८ जाफा केक सहा ग्लास गरम पाण्यासोबत अक्षरशः गिळले. त्यांचा हा वेग पाहून उपस्थित लोक आश्चर्यचकित झाले. मात्र अशा पद्धतीनं खाद्यपदार्थ खाण्यापूर्वी विशेष प्रशिक्षण घेणं आवश्यक असल्याचं मॅक्स स्टॅनफोर्ड यांनी सांगितलं.

[read_also content=”नया है यह – रेल्वे अपघात रोखण्यासाठी मेड इन इंडिया ‘कवच’ प्रणाली सज्ज, चक्क रेल्वेमंत्र्यांनी ट्रेनमध्ये बसून केली चाचणी https://www.navarashtra.com/india/rear-end-collision-testing-is-succesful-kavach-system-tested-by-railway-minister-nrsr-249157/”]

प्रोफेशनल ईटर (Professional eater) म्हणजेच केवळ खाद्यपदार्थ सेवनातून पैसे कमावणाऱ्या मॅक्स स्टॅनफोर्ड यांनी यापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये जाफा केक्स खाऊन विक्रम करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांनी १८० सेकंदात म्हणजेच ३ मिनिटांत ३६ जाफा केक खाल्ले होते. यावेळी मात्र त्यांनी ८८ केक खाल्ले. द सनच्या वृत्तानुसार, त्यांनी या स्पर्धेसाठी केवळ एकदाच सराव केला होता आणि ते हे रेकॉर्ड करण्यात यशस्वी झाले. त्यावेळी त्यांनी ४० सेकंदात २० केक खाल्ले होते. मात्र आपण ८८ केक खाऊ शकू, असा विश्वास त्यांना नव्हता. पण सराव आणि प्रशिक्षणामुळे त्यांनी हे यश मिळवले.

मॅक्स स्टॅनफोर्ड हे नेहमी खाण्याचं चॅलेंज स्वीकारतात आणि खाण्याशी संबंधित स्पर्धांमध्ये सहभागी होत असतात. त्यांचं एक युट्युब चॅनेल (असून, त्यावर ते आठवड्यातून एकदा खाण्याच्या चॅलेंजसंबंधीचा व्हिडीओ अपलोड करत असतात. त्यांनी नुकतंच ५.५ किलोग्रॅम चिकन टिक्का मसाला आणि भातासह २० चॉकलेट खाण्याचं आव्हान स्वीकारलं होतं. ब्रिटनमधल्या दक्षिण लंडनचे रहिवासी असलेले मॅक्स खाण्याचे शौकीन असले तरी यासाठी प्रशिक्षणाची गरज असल्याचं आवर्जून नमूद करतात.

Web Title: Max stanford eats 88 cakes in 3 minutes sets world record nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2022 | 06:06 PM

Topics:  

  • world record

संबंधित बातम्या

१२ बायका, १०२ मुले अन् ५७८ नातवंडांसह हा व्यक्ती बनला जगातील सर्वाधिक मुले जन्माला घालणारा माणूस!
1

१२ बायका, १०२ मुले अन् ५७८ नातवंडांसह हा व्यक्ती बनला जगातील सर्वाधिक मुले जन्माला घालणारा माणूस!

The Breakfast War : इतिहासातील सर्वात लहान युद्ध! जेवण जेवून संपावं इतक्या कमी वेळेत शत्रूने पत्कारली शरणागती
2

The Breakfast War : इतिहासातील सर्वात लहान युद्ध! जेवण जेवून संपावं इतक्या कमी वेळेत शत्रूने पत्कारली शरणागती

IND vs ENG : शुभमन गिलची विश्वविक्रमाला गवसणी! कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी मालिकेत केला ‘हा’ भीम पराक्रम..
3

IND vs ENG : शुभमन गिलची विश्वविक्रमाला गवसणी! कर्णधार म्हणून पहिल्या कसोटी मालिकेत केला ‘हा’ भीम पराक्रम..

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये LIC चा डंका ! फक्त 24 तासात केली ‘ही’ मोठी कामगिरी
4

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये LIC चा डंका ! फक्त 24 तासात केली ‘ही’ मोठी कामगिरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.