गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये LIC चा डंका ! फक्त 24 तासात केली 'ही' मोठी कामगिरी
आजच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी आयुष्यासाठी नियमित व्यायाम व संतुलित आहार गरजेचा आहे. यासोबतच सुरक्षित भविष्यासाठी लाइफ इन्शुरन्स असणे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करताना एलआयसीसारख्या विश्वसनीय कंपनीची पॉलिसी घेण्याला प्राधान्य देतात. इन्शुरन्स म्हटले की एलआयसी हे नाव आपसूकच समोर येते. नुकतेच एलआयसीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले असून, ही संस्था भारतातील करोडो लोकांच्या विश्वासाचा आधार बनली आहे.
भारतीय जीवन विमा महामंडळाने (LIC) 24 तासांत सर्वाधिक इंश्युरन्स पॉलिसी विकून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. एलआयसीने शनिवारी सांगितले की त्यांनी 24 तासांत सर्वाधिक लाइफ इंश्युरन्स पॉलिसी विकून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला आहे. हे सगळं शक्य झाले ते LIC एजंट्समुळे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
LIC च्या ऐतिहासिक कामगिरीची पुष्टी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनेच केली आहे. यासोबतच, 20 जानेवारी 2025 रोजी गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने LIC च्या नेटवर्कच्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक केले आहे. याच दिवशी देशभरातील एकूण 4,52,839 एलआयसी एजंट्सनी 5,88,107 लाइफ इंश्युरन्स पॉलिसी विकून हा विक्रम साध्य केला. एलआयसीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “24 तासांच्या आत, लाइफ इंश्युरन्स उद्योगात एजंट प्रॉडक्टिव्हिटीसाठी एक नवीन जागतिक बेंचमार्क स्थापित झाला आहे.
Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या चढउतार कायम; काय आहेत आजचे भाव? जाणून घ्या
हे आमच्या एजंट्सच्या अथक समर्पणाचे, कौशल्याचे आणि अथक परिश्रमाच्या नीतिमत्तेचे एक शक्तिशाली प्रमाण आहे,” असे कंपनीने म्हटले आहे. “ही कामगिरी आमच्या ग्राहकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना महत्त्वाची आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याच्या आमच्या ध्येयाप्रती आमची खोल वचनबद्धता दर्शवते.” हा विक्रमी प्रयत्न एलआयसीचे एमडी आणि सीईओ सिद्धार्थ मोहंती यांच्या पुढाकाराचे परिणाम आहे, ज्यामध्ये त्यांनी प्रत्येक एजंटला 20 जानेवारी २०२५ रोजी ‘मेड मिलियन डे’ रोजी किमान एक पॉलिसी पूर्ण करण्याचे आवाहन केले होते.
यावेळी बोलताना, मोहंती यांनी ‘मॅड मिलियन डे’ ऐतिहासिक बनवल्याबद्दल सर्व ग्राहक, एजंट आणि कर्मचाऱ्यांचे आभार मानले.