रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गरबा कार्यक्रमात मौनाचा क्षण
आपल्या भारताचे दिग्गज उद्योगरत्न आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. चिंताजनक प्रकृती झाल्यामुळे त्यांना बुधवारी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपाचारादरम्यान त्यांचे निधन झाले. यामुळे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. रतन टाटा यांच्या निधनानंतर अनेक ठिकाणी शोकाकाळ पसरलेला आहे.
श्रद्धांजली वाहण्यासाठी गरबा कार्यक्रमात मौनाचा क्षण
रतन टाटा यांच्या निधनानं भारतीयंचे डोळे पाणावले आहेत. याच दरम्यान नवरात्रीच्या निमित्ताने गरबा आणि उत्सवात तल्लीन व्हायचे असताना, भारताच्या अनमोल ‘रतन’ला रतन टाटा यांना मानवंदना देण्यासाठी मौन झाले. सध्या याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मुंबईमधील एक गरबा कार्यक्रमातील आहे. या व्हिडिओमध्ये रतन टाटा यांना श्रद्धांजली देण्यासाठी हजारो लोक गरबा करत असताना अचानक थांबले आहेत.
रतन टाटा यांना श्रद्धांजली वाहिली. हा व्हिडिओ मुंबईच्या मुंबईच्या NESCO,गोरेगावचा आहे. सध्या हा व्हिडिओ वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. जिथे लोक गरबा करत असताना हजारो लोक अचानक थांबले. नवरात्रीनिमित्त येथे गरब्याचे आयोजन करण्यात आले होते. पण अचानक रतन टाटांच्या निधनाची ही दु:खद बातमी कळताच हजारो लोकांनी गरबा करणे थांबवले आणि मग त्यांना श्रद्धांजली वाहली.
हे देखील वाचा- रतन टाटा यांची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल; वाचून नेटकऱ्यांचे डोळे पाणावले
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर mumbaicityexplore या अकाऊंटवर पोस्ट करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी भावूक अशा प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, भारताने उद्योग जगातील एक अनमोल रतन गमावले, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, मी देखील या ठिकाणी होतो, ही बातमी ऐकून मन अगदी भरावले, तर आणखी एक युजरने म्हटले आहे की, भारतातील सर्वात प्रसिद्ध उद्योगपती राहिले नाहीत यावर विश्वास बसत नाही. तर चौथ्या एका युजरने म्हटलेकी, सरांचा किती आदर करतात हे या व्हिडिओवरून दिसून येते. हा व्हिडिओ सगळेजण मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत.
हे देखील वाचा- शासकीय दुखवटा म्हणजे काय? तो कधी जाहीर करण्यात येता?