फोटो सौजन्य: सोशल मीडिया
भारताचे उद्योगपती जगतातील सर्वोच्च व्यक्तीमत्व आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. चिंताजनक प्रकृती झाल्यामुळे त्यांना बुधवारी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपाचारादरम्यान त्यांचे निधन झाले. यामुळे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
भारतातच नव्हे तर परदेशातही दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचा निधनाचे लोकांनी दुख: व्यक्त केले आहे. टाटा यांच्या निधनानंतर अनेक राज्यांमध्ये राजकीय शोक जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान सोशल मीडियावर त्यांची एक इन्स्टाग्राम पोस्ट व्हायरल होत आहे. ही पोस्ट वाचून नेटकरी भावूक झाले आहेत. अनेकांनी या पोस्टवर आपले दुख व्यक्त केले आहे. ही पोस्ट वाचून तुमचेही डोळे भरून येतील.
भारताचे उद्योगपती रतन टाटा यांच प्रकृती खालावल्यानंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. याचदरम्यान त्यांनी आपल्या इन्स्टाग्रावर एक पोस्ट केली होती. ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, माझ्या आरोग्याबाबत प्रसारित होत असलेल्या गोष्टींची मला जाणीव आहे. हे सगळे निराधार आहे याची मी खात्री देतो. चिंता करू नका. माझे वय आणि काही वैद्यकीय परिस्थितीमुळे मी तपासणी करून घेत आहे. तसेच मी विनंती करतो की लोकांनी आणि माध्यमांनी चुकीची माहिती पसरवू नये. असे रतन टाटा यांनी म्हटले आहे.
रतन टाटा यांची पोस्ट
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वत्र शेअर केली जात आहे. अनेकजण ही पोस्ट पाहून भावूक झाले आहेत. यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रीया देण्यास सुरूवात केली आहे. एका युजरने म्हटले आहे की, तुम्ही खोटे बोललात, का? तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भारताने एक अनमोल रत्न गमावला. तिसऱ्या एका यूजरने म्हटले आहे की, ‘कृपया कोणीतरी सांगा की ही बातमी खोटी आहे.’ तर अनेकांनी त्यांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना केली आहे. अनेकजणांनी यावर भावूक प्रतिक्रीया दिल्या आहेत.