भारताचे उद्योगपती जगतातील सर्वोच्च व्यक्तीमत्व आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. चिंताजनक प्रकृती झाल्यामुळे त्यांना बुधवारी मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपाचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. यामुळे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. देशातच नव्हे, तर परदेशातही दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचा सन्मान झाला आहे. टाटा यांच्या निधनानंतर अनेक राज्यांमध्ये राजकीय शोक जाहीर करण्यात आला आहे. पण तुम्हाला माहित आहे का, पण तुम्हाला माहित आहे की, शासकीय दुखवटा म्हणजे काय? तो कधी जाहीर करण्यात येतो. आज आपण या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊ.( फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
शासकीय दुखवटा म्हणजे काय? तो कधी जाहीर केला जातो?
भारताचे उद्योगरत्न आणि टाटा समुहाचे प्रमुख रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर 2024 रोजी दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वत्र शोकाकाळ पसरली आहे
महाराष्ट्र शासनाने आज शायसकीय दुखवटा जाहीर केली आहे
तर संपूर्ण राज्याचे किंवा राष्ट्राचे शोक व्यक्त करण्याचा एक प्रतिकात्मक मार्ग म्हणजे शासकीय दुखवटा
शासकीय दुखवटा जाहीर केल्यानंतर राज्यात, देशांतील शासकीय कार्यालयांवर अर्ध्यावर फडकवण्यात येतो
या कालावधीमध्ये कोणतीही सरकारी कार्यक्रम, घोषणा केली जात नाही. तसेच कोणते मेळावे आणि सभा घेण्यात येत नाही
याशिवाय कोणतेही मनोरंजन आणि करमणुकीचे कार्यक्रम केले जात नाहीत
निधन झालेल्या व्यक्तीचे शासकीय सन्मानाने अत्यंसंस्कार केले जातात
अत्यंतयात्रेच्या वेळी निधन झालेल्या व्यक्तीच्या पार्थीवावर देशाचा राष्ट्रध्वज ठेवला जातो. अत्यंसंस्कारपूर्वी ध्वज काढून सन्मानपूर्वक व्यक्तीच्या नातेवाईतांकडे सुपूर्त केला जातो
निधन झालेल्या व्यक्तीला लष्करी सन्मानात मानवंदना देण्यात येते. पोलिस दलाकडून बंदूकीच्या गोळ्या झाडून सलामी दिली जाते