Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 16 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

1955 मध्ये उड्डाण भरलेले विमान 30 वर्षांनंतर लँड झाले… Flight 914 ची रहस्यमय कथा!

30 वर्षांनंतर लँड झालेल्या प्रसिद्ध Flight 914 ची रहस्यमयी कथा माहिती आहे का? ऐकूनच अंगावर शहारा येईल. कथेची सत्यता आणि त्यातील गूढ याविषयी सविस्तर वाचा आणि जाणून घ्या. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 18, 2024 | 01:08 PM
Flight 914 ची रहस्यमय कथा!

Flight 914 ची रहस्यमय कथा!

Follow Us
Follow Us:

टाइम ट्रॅव्हलविषयी तर तुम्ही अनेकदा ऐकले असेल. याबद्दल अनेक लोक वेगवगेळ्या प्रकारचे दावे करतात. काही लोक याला वास्तविकता मानतात तर काही याला केवळ एक अफवा असल्याचे सांगतात. मात्र यामागचे खरे काय, हे कोणालाच ठाऊक नाही. आजवर कोणीही टाइम ट्रॅव्हल केले नाही किंवा ऐकले नाही. शास्त्रज्ञांच्या दाव्यांवर विश्वास ठेवला तर हे लक्षात येते की, सध्या टाइम ट्रॅव्हल करणे शक्य नाही, परंतु भविष्यात ते शक्य होईल. तथापि, वर्षानुवर्षे लोक याच्या संबंधित कथा सांगत आहेत. पण फ्लाइटशी संबंधित एक घटना इतकी रंजक आहे की ती ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल.

आज आम्ही तुम्हाला सांगत असलेली गोष्टदेखील टाइम ट्रॅव्हलवर (American flight time travel) आधारित आहे. ही एका सत्य घटनेवर आधारित कथा आहे, जिला अनेकजण आजवर खरी समजतात. या घटनेसंबंधी अनेक बातम्या बनवल्या गेल्या मात्र या रहस्यमयी घटनेमागचे सत्य काहीतरी वेगळेच आहे.

न्यूज एजन्सी AFP च्या 2021 च्या रिपोर्टनुसार, केनिया आणि भारत सारख्या देशांमध्ये फ्लाइट 914 बद्दल खूप चर्चा आहे. याच्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत होत्या, ज्यामध्ये या फ्लाइटची माहिती देण्यात आली होती. प्रथम आपण या फ्लाइट वरून काय दावे करण्यात आले हे जाणून घेऊयात, त्यानंतर आम्ही तुम्हाला त्याबद्दल संपूर्ण सत्य सांगू.

हेदेखील वाचा – Viral: स्वतःवर गोळी झाडत भारतीय कॉन्स्टेबलने केली आत्महत्या, मरण्यापूर्वी शेअर केला हृदयद्रावक Video

30 वर्षांनंतर लँड विमान

व्हायरल झालेल्या पोस्टनुसार, फ्लाइट 914 ने 1955 मध्ये न्यूयॉर्क, अमेरिकेतून उड्डाण घेतले. मात्र उड्डाणाच्या काही क्षणातच हे विमान अवकाशात दूर उडून अचानक गायब झाले म्हणजेच दिसेनासे झाले. त्यांनतर या विमानाचा फार शोध घेण्यात आला मात्र अनेक प्रयत्नानंतरही हा विमान सापडला नाही. त्यावेळी या विमानात एकूण 57 प्रवासी प्रवास करत होते. विमानाचा अपघात झाला असावा या शंकेने अनेकजागी या विमानाला शोधण्यात आले मात्र या विमानाचा एकही भाग सापडला नाही.

त्यानंतर अचानक 985 मध्ये, हे फ्लाइट मियामीच्या हवाई वाहतूक नियंत्रणाशी संपर्क साधते आणि उतरण्यास सांगते. एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या लोकांनाही ही माहिती ऐकून आश्चर्य वाटते कारण अशा कोणत्याच विमानाची त्यांना माहिती मिळालेली नसते. जेव्हा फ्लाइट लँड होते, तेव्हा कळते की ही तीच Pan Am Flight 914 आहे जी 30 वर्षांपूर्वी गायब झाली होती.

बातमीचे सत्य काय?

न्यूज एजन्सी एएफपीच्या रिपोर्टनुसार, फ्लाइट बेपत्ता झाल्याचा दावा साफ खोटा आहे. असे कोणतेही प्रकरण मुळात समोर आले नाही. खरं तर ही माहिती 1985 मध्ये पहिल्यांदा अमेरिकन प्रिंट टॅब्लॉइड, साप्ताहिक वर्ल्ड न्यूजमध्ये प्रकाशित झाली होती. यामध्ये अनेक काल्पनिक कथा प्रकाशित केल्या जायच्या. ही कथा त्यामधील एक काल्पनिक कथा होती, जिला अनेक लोकांनी सत्य म्हणून स्वीकारले आणि वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये प्रकाशित करण्यास सुरुवात केली.

 

Web Title: Mysterious story pan am flight 914 take off in 1955 land after 30 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2024 | 01:05 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.