Need this much confidence in life Man’s Half-Printed Resume Goes Viral
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. कधी मजेशीर, कधी चित्र-विचित्र, कधी भयावह अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक गोष्टी पाहायला मिळतात.आता या सोशल मीडियामुळे बऱ्याच गोष्टी अगदी सोप्या झाल्या आहेत. तुम्हाला नोकरी शोधण्यासाठी देखील दरदर भटकावे लागत नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरुन तुम्ही नोकरीसाठी अर्ज करु शकतात. परंतु अनेकदा नोकरीच्या शोधात लोक काय करतील हे सांगणे कठीण आहे.
नोकरीसाठी बनवला जाणारा रेज्यूम देखील अगदी भन्नाट असा तयार केलेला असता. कोणी ग्राफिक्सचा वापर करते, तर कोणी आपली कौशल्ये चंद्रावर घेऊन जाणारी असल्याचे बोलते. सध्या असाच एक रेज्यूम सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा रेज्यूम पाहून केवळ कंपनींचे नव्हे तर सर्वच लोक चक्रावले आहेत. या तरुणाने आपल्या रेज्यूम असा काही प्रिंट केला आहे की, सध्या हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. चला जाणून घेऊयात तरुणाने नक्की काय केले आहे.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या रेज्यूमने गोंधळ उडवला आहे. यामध्ये एका तरुणाने आपला रेज्यूम अर्धा प्रिंट केला आहे.यामध्ये केवळ त्याचा अर्धा फोटा, त्याचा उद्देश दिसून येते आहे. यानंतर त्याने खाली एक भन्नाट अशी एक ओळ लिहिली आहे ,जी वाचून सर्वच चक्रावले आहे. तरुणाने लिहिले आहे की, “Hire Me To unlock My Full Potential” म्हणजेच “माझी क्षमता जाणून घेण्यासाठी आधी मला कामावर ठेवा” असे या तरुणाने म्हटले आहे. सध्या या रेज्यूमने सर्वांचे लक्ष्य वेधून घेतले आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Bro intentionally printed half a resume and wrote: ‘Hire me to unlock full potential.’ Man submitted a demo version of himself.😂
byu/eloanmask infunny
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा रेज्यूम सोशल मीडिया प्लॅटफॉर्म रेडिटवर शेअर करण्यात आला आहे. सध्या या रेज्यूमने सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे. एका युजरने म्हटले आहे की, “याला नोकरी नक्की मिळेल, पण त्याने कॉन्टॅक्ट नंबरच नाही दिला”, तर दुसऱ्या एकाने, “हा आतापर्यंतचा सर्वात बेस्ट रेज्यूम” आहे असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने मी रिक्रूटर असतो तर शंभर टक्के नोकरी दिली असती असे म्हटले आहे. अशा विविध प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहे. सध्या हा रेज्यूम सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.