(फोटो सौजन्य: Instagram)
बायको ही शेवटी बायकोच असते. नवरा कितीही शेर निघाला तरी बायको त्याच्या समोर सव्वाशेर ठरते. बायकोची ही दहशत फक्त मानवांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही दिसून येते आणि मग शेवटी बायको ही बायकोच असते हे समीकरण पुन्हा एकदा नजरेस पडतं. नुकताच एक मजेदार व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. यात एक गोरिला एक महिलेसोबत फ्लर्टिंग करताना दिसून येतो मात्र तितक्यात मागून त्याची बायको येते आणि मग जे घडत ते पाहून तुम्हालाही हसू अनावर होईल. चला यात काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
मानव आणि प्राण्यांचे आयुष्य वेगळे असले तर काही गोष्टी या सारख्याच असतात ज्या कधीही बदलून शकत नाहीत आणि यातीलच एक म्हणजे नवरा-बायकोच नातं! व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक गोरिला एका महिलेच्या केसांशी खेळताना दिसून येत आहे. गोरिला एक प्रकारे महिलेसोबत फ्लर्टींग करतच असतो तितक्यात मागून त्याची बायको त्याला हे सर्व करताना पाहते. यानंतर काय होणार पतीला दुसऱ्या स्त्रीसह पाहताच पत्नी संतापते आणि रागात धावत पळत येऊन पतीच्या केसांना पकडून त्याला खेचत घेऊन जाते. पत्नीचा राग आणि पतीची भीती हे दृश्य फारच हास्यास्पद वाटू लागते. आपली चोरी पकडली गेली आहे जे जाणवताच गोरिला लाजेने लाल होतो आणि गप्पा पत्नीचा मार खाऊन घेतो. हे दृश्य आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून संपूर्ण पती समाज आता कमेंट्समध्ये गोरिलाला धीर देण्याचा प्रयत्न करत आहे.
पांचट Jokes : दादा मला तुला काहीतरी सांगायचं आहे… हसून हसून पोट दुखवेल दोन भावंडाचं हे संभाषण
हा व्हायरल व्हिडिओ @viral_india.official नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भाऊ आपण पती आहोत ना, आपल्यासोबत हे असंच होणार” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “म्हणजे हे फक्त माणसांमध्येच नाही तर प्राण्यांमध्येही घडत” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “जगातील सर्व महिला सारख्याच आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.